मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुणेकरांचा नाद करायचा नाही! सुरक्षा रक्षकाची नोकरी सोडून सुरू केला स्टार्टअप; आता 2 लाखांपर्यंत बिझनेस

पुणेकरांचा नाद करायचा नाही! सुरक्षा रक्षकाची नोकरी सोडून सुरू केला स्टार्टअप; आता 2 लाखांपर्यंत बिझनेस

12 हजारांची नोकरी सोडून आता हा 28 वर्षांचा तरुण लाखोंचा व्यवसाय करीत आहे

12 हजारांची नोकरी सोडून आता हा 28 वर्षांचा तरुण लाखोंचा व्यवसाय करीत आहे

12 हजारांची नोकरी सोडून आता हा 28 वर्षांचा तरुण लाखोंचा व्यवसाय करीत आहे

  • Published by:  Meenal Gangurde

पुणे, 27 फेब्रुवारी : पुण्यातील रेवन शिंदेची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. सुरक्षा रक्षकाची नोकरी सुटल्यानंतर त्यांनी चहाचा स्टार्टअर सुरू केला. या स्टार्टअप अंतर्गत एका फोनवर तुमच्या घरापर्यंत गरमागरम चहा येऊ शकतो. विशेष म्हणजे पहिल्यांदा चहा मागवला तर चहाचा कप तुम्हाला मोफत देण्यात येईल. रेवनने जून 2020 मध्ये या स्टार्टअपची सुरुवात केली होती, ज्यात त्याला एका महिन्यात तब्बल 50000 रुपये नफा मिळाला होता. मिळालेल्या माहितीनुसार त्याचे 5 कर्मचारी एका दिवसात तब्बल 700 कप चहाची विक्री करतात. (Punekar Startup started leaving security guard job Business up to 2 lakhs)

28 वर्षीय रेवनने 12 वीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. 6 वर्षांपूर्वी कामाच्या शोधात तो भाऊ-बहिणींना घेऊन पुण्यात आला होता. येथील पिंपर-चिंचवड भागात एका लॉजिस्टिक्स कंपनीत 12 हजार रुपयांच्या पगारावर तो सुरक्षा रक्षकांचं काम करू लागला. 2019 मध्ये त्याची कंपनी बंद पडली. त्यानंतरही स्नॅक्स सेंटर आणि लहान-मोठं काम करून तो घर चालवत होता. (Punekar Startup started leaving security guard job Business up to 2 lakhs ) 15 मार्च रोजी त्याने भाड्याने एक दुकान घेतलं आणि चहाची टपरी सुरू केली.

कशी केली सुरुवात?

कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये रेवनची सेव्हिंग संपली होती, शिवाय हातात नोकरीदेखील नव्हती. अशात त्याने थर्मासमध्ये चहा घेऊन ग्राहकांकडे जाऊन चहा विकायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याने मोफत चहाची विक्री केली. ग्राहकांना चहाची चव आवडल्यानंतर ते अधिक मागणी करू लागले आणि अशा प्रकारे त्याचा बिझनेस वाढू लागला.

हे ही वाचा-कोरोनाच्या धोक्यामुळे अंगारकी चतुर्थीला दगडूशेठ गणपती मंदिर राहणार बंद

50 हजार रुपयांचं उत्पन्न

काही दिवसांनंतर लोक चहासाठी फोन करू लागले. रेवनने मेन्यू कार्डमध्ये आल्याचा चहा याशिवाय कॉफी आणि गरम दूधदेखील सुरु केलं. रेवन चहाचा लहान कप 6 आणि मोठा कप 10 रुपयांना विकतो. रेवन म्हणतो की तो प्रत्येक महिन्याला साधारण 2 लाखांचा व्यवसाय करतो, ज्यात त्याला 50 हजारांचा नफा होतो.

First published:

Tags: Career, Career opportunities, Maharashtra, Money, Pune, Startup, Startup Success Story