मुंबई, 16 ऑगस्ट : हुंडा प्रथेमुळे अनेकांचं संसार हे आज उद्धवस्त झाले आहे तर कित्येक आई-बाप हे कर्जबाजारी झाले आहे. हुंड्याला प्रत्येक महिलेनं आणि स्विकारणाऱ्यानेही विरोध करावा या हेतून पुण्यातील एका तरुणीने आपल्या लग्नासाठी जमवलेल्या पैशातून भारताच्या स्वातंत्र्यदिनी दक्षिण आफ्रिकेतील सर्वोच्च अशा किलिमांजारो शिखर (kilimanjaro mountain) सर केला, नुसता सर केला नाहीतर शिखरावरून हुंडा घेऊ नका असा संदेशही दिला.
स्मिता घुगे (smita ghuge) असं या तरुणीचं नाव आहे. स्मिता घुगे या पुण्यातील धनकवडी परिसरात राहणाऱ्या आहे. दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी देशाचा तिरंगा जगभरातील वेगवेगळ्या शिखरांवर तिरंगा फडकवून आगळेवेगळे कार्य करणाऱ्या एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोरर मार्फत यंदा आफ्रिका इथं एक मोहिम आयोजित केली होती. या मोहिमेत स्मिता घुगे या सहभागी झाल्या होत्या. आफ्रिकेतील टांझानिया देशातील हे शिखर असून याची उंची समुद्र सपाटी पासून तब्बल19,341 फूट आहे.
घ्या आता! स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात राष्ट्रगीतच विसरले खासदार
या मोहिमे अंतर्गत स्मिता घुगे यांनी 15 ऑगस्टच्या निमित्ताने किलीमांजारो या शिखर सर केला. शिखरावर पोहोचल्यानंतर स्मिताने भारताचा झेंडा तर फडकवलाच. पण, लाखो महिलांचा पैशापायी छळ करणाऱ्या हुंडा प्रथेबद्दल सामाजिक संदेशही दिला. एवढंच नाहीतर, हुंड्याच्या पैशातून मी हा शिखर सर केला, असंही बॅनरच्या माध्यमातून ठणकावून सांगितलं. स्मिता घुगे यांनी युनायटेड नेशन्सच्या गोल्ससाठी ही मोहीम समर्पित करत हुंडापद्धतीला विरोध केला आहे.
स्मिता यांनी आपल्या लग्नासाठी 5 लाखांची रक्कम गोळा केली होती. पण, सतत लग्नाचा तगादा आणि त्यातून आजही हुंडा मागण्याची विकृत प्रथा मोडीत काढण्यासाठी स्मिता यांनी हे पाऊल उचचले.
विशेष म्हणजे, अत्यंत प्रतिकुल अशी परिस्थिती असलेल्या किलीमांजारो या शिखरावर देशाच्या 75 व्या स्वतंत्र दिना निमित्ताने स्मिता घुगे यांनी चक्क 75 फूट लांबीचा राष्ट्रध्वज फडकवून एक अनोखा विश्व विक्रम येथे स्थापित केला आहे. स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने किलीमंजारो येथे राष्ट्रध्वज फडकवणारी स्मिता घुगे ही महाराष्ट्रातील नाही तर देशातील पहिली महिला ठरली आहे.
'स्मिता घुगे हिच्या स्वप्नावरील प्रेम व जिद्द याची तोड कशाशीही करता येणार नाही. यातील किलीमांजारो सर करून त्यावर हुंडाविरोधी नारा देऊन स्मिता यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. युनायटेड नेशन्स वूमन आणि गोल्ससाठी कार्य करत प्रत्येक महिलेला काहीतरी वेगळे करण्यासाठी मार्गदर्शन करणे हाच आमचा उद्देश आहे' असं आनंद बनसोडे म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.