Elec-widget

पत्नीला पास करण्यासाठी अजब शक्कल, कॉलेज संचालकाने प्राध्यापकाकडूनच सोडवले पेपर

पत्नीला पास करण्यासाठी अजब शक्कल, कॉलेज संचालकाने प्राध्यापकाकडूनच सोडवले पेपर

मोठे अधिकारी आणि मंत्री काय करतील ना याचा नेम नाही. असाच एक धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे.

  • Share this:

पुणे, 14 जुलै : मोठे अधिकारी आणि मंत्री काय करतील ना याचा नेम नाही. असाच एक धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. पुण्यातल्या झिल एज्युकेशन सोसायटीच्या संचालकाने आपल्या पत्नीचे अभियांत्रिकीचे पेपर चक्क आपल्याच कॉलेजमधील प्राध्यापकाकडून सोडवून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे माणूस आपल्या पदाचा कसा वापर करून घेतो याचा अंदाज तुम्ही लावूच शकता.

यासंबंधीत प्राध्यापकानेच विद्यापीठाकडे तक्रार केल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. त्यावर विद्यापीठाने तात्काळ चौकशी समितीही नेमली खरी पण आता तक्रारदार प्राध्यापकानेच असं काही घडलंच नसल्याचं पत्रिज्ञापत्र विद्यापीठाला सादर केलं आहे.

स्कूल बसच्या चाकाखाली चिरडून 3 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

त्यामुळे विद्यापीठाची चौकशी समिती नेमकी काय कारवाई करणार, असा प्रश्न निर्माण झालाय. झिल एज्युकेशन सोसायटीचे संचालक जयेश काटकर यांची पत्नी स्नेहल सुरेश जगताप हिचे एमईच्या पहिल्या वर्षाचे पेपर्स प्राध्यापक जैन यांच्याकडून लिहून घेतल्याची तक्रार विद्यापीठाकडे प्राप्त झाली होती. पण आता तक्रार करणाऱ्या प्राध्यापकाने त्याची तक्रार मागे घेत असं काही झालंच नसल्याचं म्हटलं आहे, त्यामुळे ही माघार का आणि कशी असा प्रश्न उपस्थित होतो.

हेही वाचा...

Loading...

केवळ 50 हजारात सुरू करा CCTVचा व्यवसाय, कमवा लाखो रुपये

2019च्या निवडणूकीपूर्वी राम मंदिराच्या बांधकामाला सुरूवात करू - अमित शहा

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 14, 2018 02:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com