Home /News /pune /

Pune: छेडछाडीची तक्रार केल्याचा राग; अल्पवयीन मुलीवर हातोडीने प्राणघातक हल्ला, तळेगावातील घटनेने पुणे हादरले

Pune: छेडछाडीची तक्रार केल्याचा राग; अल्पवयीन मुलीवर हातोडीने प्राणघातक हल्ला, तळेगावातील घटनेने पुणे हादरले

एका अल्पवयीन मुलीवर हातोड्याने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Pune youth hits hammer on minor girl)

    पुणे, 29 जानेवारी: राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत. पुण्यातही महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांत वाढ होताना दिसत आहे. आता पुण्यातील तळेगाव (Talegaon Pune) येथून एक खळबळजनक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीच्या डोक्यात एका तरुणाने हातोडा मारुन जीवघेणा हल्ला केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. (Youth hits hammer on minor girl head in Talegaon Pune) पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. गुरुवारी ही घटना घडली आहे. पोलिसांत छेडछाडीची तक्रार केल्याचा राग मनात धरुन आरोपीने या मुलीवर हातोडीने हल्ला केला. गुरुवारी सायंकााळच्या सुमारास साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. वाचा : हातोड्यानं पतीची हत्या करणाऱ्या पत्नीला पोलिसांनी दिलं सोडून, हे आहे त्यामागचं कारण आरोपी तरुणाने 'तुला जिवंत सोडणार नाही, तुला खल्लास करतो' असं म्हणत तरुणीच्या डोक्यात हातोडा मारला. या घटनेत पीडित मुलगी गंभीर जखमी झाली आहे. पीडित मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, पीडित मुलगी ही 17 वर्षीय आहे. या मुलीने काही दिवसांपूर्वी आरोपी शिवम शेळके याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली होती. आरोपी छेडछाड करत असल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. याचाच राग मनात धरुन आरोपीने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. आरोपी शिवम शेळके हा 20 वर्षीय असून तो तळेगाव दाभाडे येथील निवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. वाचा : 'दृश्यम' सिनेमातून प्रेरणा घेत कुटुंबाने केला गुन्हा; एका चुकीमुळे पोहोचले गजाआड पोलिसांवर कारवाईची मागणी तळेगावात अल्पवयीन मुलीला सतत एका माथेफिरू कडून त्रास, त्या संदर्भात वांरवार पोलीस स्टेशनला तक्रारी दिल्या. पोलिसांनी ना दखल घेतली, ना कारवाई केली. भरदिवसा बाजारात त्याने मुलीच्या डोक्यात हातोडा मारला. दखल घेतली असती तर हा हल्ला टाळता आला असतां, तात्काळ निष्क्रीय पोलिसांवर कारवाई करा अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Crime, Crime news, Maharashtra, Pune

    पुढील बातम्या