मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

Pune : नवरा नपुंसक असल्याचं तरुणीने केलं जगजाहीर; शेवटी पोलिसांकडून कारवाई

Pune : नवरा नपुंसक असल्याचं तरुणीने केलं जगजाहीर; शेवटी पोलिसांकडून कारवाई

ही तरुणी पुण्याची असल्याचं समोर आलं आहे.

ही तरुणी पुण्याची असल्याचं समोर आलं आहे.

ही तरुणी पुण्याची असल्याचं समोर आलं आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

पुणे, 8 नोव्हेंबर : लग्नानंतर मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वारंवार बातमीपत्रातून आपण पाहतो. या बातम्या मन सुन्न करणाऱ्या असतात. लग्नानंतर आई-बाबांचं घर सोडून जेव्हा मुलगी सासरी जाते तेव्हा तिला प्रेमाची अपेक्षा असते. मात्र अनेकदा तिला त्रास दिला जात असल्याच्या घटना समोर येतात. (Pune Young woman declares her husband is impotent Finally action by the police)

मात्र आज काल तरुणींकडूनच त्रास दिल्याच्याही घटना समोर येऊ लागल्या आहेत. पुण्यातून (Pune News) अशीच एक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने लग्नानंतर आपल्या नवऱ्याला त्रास देऊन त्याची बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर तिच्या नवऱ्याने महिलेविरोधात पोलिसात तक्रार केली. ही घटना जानेवारी 2019 ते 23 जानेवारी 2021 दरम्यान घडली आहे. त्यामुळे 30 वर्षीय व्यक्तीने समर्थ पोलिस ठाण्यात आपली तक्रार नोंदवली आहे.

हे ही वाचा-दिवाळीत लक्ष्मीला पूजलं, नंतर घरातल्या 'लक्ष्मी'चाच केला शेवट; पतीचं भयावह पाऊल

नवऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतर बायको काही ना काही कारणावरुन त्याच्यासोबत भांडण करीत होती. त्याला शिवीगाळदेखील करायची. ती एवढ्यावरच थांबली नाही, तर त्याला धमकी देऊ लागली. ही महिला माझा नवरा नपुंसक असल्याचे खोेटे आरोप  सार्वजनिकपणे करीत होती. यामुळे तरुणाला मानसिक त्रास सहन करावा लागत होता. शेवटी त्यांनी पोलीस ठाण्यात बायकोविरोधात तक्रार केली.

या तक्रारीत त्याने पोलिसांना सांगितलं की, 23 जानेवारी रोजी पत्नी घरात घुसली आणि कपाटात आईचे तब्बल 8 ते 9 तोळे दागिने, 25 तोळे चांदीची पट्टी असं बरसचं सामान घेऊन निघून गेली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. न्यायदंडाधिकारी (JMFC, Shivajinagar Court) यांच्या आदेशानुसार समर्थ पोलिसांनी या प्रकरणाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

First published:

Tags: Crime news, Pune