मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

Pune : डोळ्यावर स्कार्फ बांधून उच्चशिक्षित तरुणीची इमारतीवरून उडी, आत्महत्या की घातपात?

Pune : डोळ्यावर स्कार्फ बांधून उच्चशिक्षित तरुणीची इमारतीवरून उडी, आत्महत्या की घातपात?

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Pune girl jumps from building: पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुणीने डोळ्यावर पट्टी बांधून इमारतीवरुन उडी घेतली आहे.

  • Published by:  Sunil Desale
पुणे, 22 डिसेंबर : पुण्यातील एका उच्चशिक्षित तरुणीने इमारतीवरुन उडी (pune girl jumps from building) घेत आपलं आयुष्य संपवलं आहे. पुण्यातील वाकड (Wakad Pune) परिसरात सोमवारी (20 डिसेंबर रोजी) ही घटना घडली आहे. या तरुणीने इतकं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाहीये. उच्चशिक्षित तरुणीने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयानंतर एकच खळबळ उडाली आहे. (Pune girl jumps from building in Wakad area) डोळ्यावर स्कार्फ बांधून आत्महत्या मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृतक तरुणी ही 24 वर्षीय होती. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास तीने वाक़ परिसरातील एका इमारतीच्या छतावरुन सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उडी घेतली. आपल्या डोळ्यावर स्कार्फ बांधून तिने इमारतीच्या छतावरुन उडी मारली असं बोललं जात आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. इमारतीच्या छतावरुन उडी मारल्यामुळे ही तरुणी गंभीर जखमी झाली होती. तिला स्थानिकांनी तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात तिला उपचारासाठी नेण्यात आंल मात्र, तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. वाचा : हृदयद्रावक! अखेर मृत्यूशी झुंज संपली, नांदेडात 45 वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत उच्चशिक्षित तरुणीने का घेतला हा निर्णय? मिळालेल्या माहितीनुसार, मृतक तरुणीचं बीटेक (आयटी) पर्यंत शिक्षण झाले होते. मध्यमवर्गीय कुटुंबातील ही मुलगी होती. तिने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे कुटुंब धुळ्याचे असून मृतक मुलीच्या भावाला पुण्यात नोकरी लागल्याने ते वाकड येथे शिफ्ट झाले होते. आपल्या मुलीच्या आत्महत्याच्या वृत्ताने आई-वडिलांना एक मोठा दक्का बसला आहे. डोळ्यावर स्कार्फ बांधून तरुणीने इमारतीवरुन उडी घेतल्याने ही आत्महत्या होती की घातपात याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. तिच्या आत्महत्येमागचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. अन् 2 महिन्यातच उद्धवस्त झाला संसार, पत्नीचा खून करून पंख्याला लटकवलं पिंपरी चिंचवडमध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या करुन आत्महत्या केल्याचा बनाव समोर आला होता. या प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी हत्येप्रकरणी अखेर अटक केली आहे. आरोपीनं आधी पत्नीची हत्या केली आणि त्यानंतर पत्नीनं आत्महत्या केल्याचा बनाव रचल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तपासादरम्यान पोलिसांना पतीवर संशय आला. तसंच या प्रकरणाचा तपास करत असताना असे काही पुरावेही मिळाले की, हे प्रकरण आत्महत्येचे नसून खूनाचं असल्याचा पोलिसांना संशय आला. आरोपी पतीचं नाव हेमंत असून मृत पत्नीचं नाव सपना आहे. पोलिसांनी सांगितलं की, आरोपी कराड जिल्ह्यातील रहिवासी असून तो ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतो. मेट्रोमोनियल साइटवर दोघांची भेट झाली. हळूहळू दोघे प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र दोघांचंही कुटुंब या लग्नासाठी तयार नव्हते. असे असूनही दोघांनी 28 ऑक्टोबर 2021 रोजी लग्न केलं होतं.
First published:

Tags: Crime, Pune, Suicide

पुढील बातम्या