पुण्यामध्ये कठीण प्रसंगात माणुसकीचा प्रत्यय, ही माऊली पुरवते विद्यार्थ्यांना मोफत डबे

पुण्यामध्ये कठीण प्रसंगात माणुसकीचा प्रत्यय, ही माऊली पुरवते विद्यार्थ्यांना मोफत डबे

कोरोनाच्या (Coronavirus) संकटामुळे पुण्यात सर्वकाही बंद ठेवण्यात आलं आहे. अशावेळी बाहेरून शिक्षणासाठी आलेल्या मुलांच्या जेवणाचा प्रश्न उपस्थित होतो. मात्र या मुलांसाठी साक्षात 'अन्नपूर्णा' धाऊन आली आहे.

  • Share this:

पुणे, 19 मार्च : पुणे शहराला विद्येचं माहेरघर म्हटलं जाते. अनेक नामांकित महाविद्यालये पुणे शहरात असल्यामुळे देशभरातून अनेक विद्यार्थी पुण्यामध्ये शिक्षणासाठी येतात. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुणेकरांची उस्फुर्त लॉकडाऊन पाळलं आहे. पुण्यामधील रस्ते ओस पडले आहेत तर अनेक ठिकाणी दुकाने सुद्धा बंद आहेत.अशावेळी या बाहेरून शिक्षणासाठी आलेल्या मुलांच्या जेवणाचा प्रश्न उपस्थित होतो. मात्र या मुलांसाठी साक्षात अन्नपूर्णा धाऊन आली आहे.

(हे वाचा-आई मृत्यूशी झूंज देत असताना कोरोनाग्रस्तांसाठी झटत आहेत आरोग्यमंत्री राजेश टोपे)

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून पुणेकर सर्व प्रयत्न करत आहेत. सर्वकाही बंद असल्यामुळे खानावळी त्याचप्रमाणे हॉटेल्सही बंद आहेत. अशावेळी पुण्यात बाहेरून आलेल्या मुलांना केवळ माणूसकी म्हणून विद्या जितेंद्र जोशी यांनी विनामूल्य जेवण देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये त्यांच्या कुटुंबीयांचा देखील हातभार आहे. पुण्यात बाहेरून आलेल्या मुलांशी नात्याने कोणताच संबध नसताना जोशी कुटुंबीय त्यांना जेवण देत आहेत.

कोरोना पुण्यात पोहोचण्याआधी देखील त्या या मुलांना डबे पुरवायच्या आता लोकं 'सोशल डिस्टन्सिंग'च्या गोष्टी करत असताना मात्र ही माऊली जेवण देऊन परक्या विद्यार्थ्यांना आपलसं करत आहे.

(हे वाचा- Corona Virus: युद्ध लढत आहोत.. घाबरु नका, घाबरून युद्ध जिंकलं जात नाही)

विद्या जोशी या सांगलीमध्ये शिक्षण घेत असताना त्या देखील मेसचं जेवण जेवायच्या. त्यावेळी परिक्षेदरम्यान काही कारणास्तव त्यांची मेस बंद होती. हॉटेलची देखील तशी फारशी चांगली सोय नसल्यामुळे त्यांना उपाशीच राहावं लागलं होतं. त्यामुळे पेपरदरम्यानच त्यांना चक्कर आली. ही आठवण त्यांच्या मनावर कायमची कोरली गेली. अशी परिस्थिती दुसऱ्या कुणावर उद्भवू नये याकरता त्या विद्यार्थ्यांना मोफत जेवण पुरवतात, अगदी संपूर्ण पुणे लॉकडाऊनकडे झुकत असताना सुद्धा!

First published: March 19, 2020, 8:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading