Home /News /pune /

Pune News: बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळली होती महिला; हत्या झाल्याचं उघड, 10 दिवसांनंतर धक्कादायक माहिती आली समोर

Pune News: बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळली होती महिला; हत्या झाल्याचं उघड, 10 दिवसांनंतर धक्कादायक माहिती आली समोर

बाथरूममध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या हत्या प्रकरणाचं गूढ उकललं आहे

बाथरूममध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या हत्या प्रकरणाचं गूढ उकललं आहे

Pune News: बाथरूममध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या हत्या प्रकरणाचं गूढ उकललं आहे. पुणे पोलिसांनी आरोपीला बिहारमधून अटक केली आहे.

पुणे, 17 फेब्रुवारी : 10 दिवसांपूर्वी पुण्यातील मोझे आळी, लोहगाव (Mojhe Aali Lohgaon Pune) येथे एका घरात महिला बेशुद्धावस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तपासले असता त्या महिलेचा मृत्यू झाला होता. 6 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली होती. ही महिला आपल्याच घरातील बाथरूममध्ये मृतावस्थेत (Woman found dead in house toilet) आढळून आली होती. संशयास्पद रित्या महिलेचा मृत्यू झाल्यामुळे पोलिसांनी मोठ्या शिताफीने आपला तपास सुरू केला. गळा आवळून खून तर, या महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला असल्याचा शवविच्छेदन पोलिसांना मिळाला. यानंतर पोलिसांनी आपली सूत्र हालवली आणि तपास सुरू केला. अधिक तपासात त्यांच्याच घरात पूर्वी राहणाऱ्या भाडेकरू इसमाने त्यांचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले. वाचा : Netflixवेबसीरिजमधून प्रेरणा घेत बनवली Kidnapping Gang; धक्कादायक घटनेचा पर्दाफाश खूनाचे कारण काय? पूर्वी त्या महिलेच्या घरात राहणाऱ्या भाडेकरूनेच अनैतिक संबंधातून हे कृत्य केलं असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तात्काळ आरोपी इसम मोहम्मद मुक्तार शेख याचा शोध घेण्यासाठी विशेष पथक पाठविण्यात आले होते. आरोपी बिहारचा निवासी अनैतिक संबंधातून महिलेचा गळा आवळून खून करून पसार झालेल्या आरोपीला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव मोहम्मद गुलाब मोहम्मद मुक्तार शेख असे असून तो बिहारचा निवासी आहे. वाचा : शिवसेना उपनेत्यावर पुण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल बिहारमधून आरोपीच्या आवळल्या मुसक्या तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी मोहम्मद हा खून करून त्याच्या मूळ गावी बिहार येथे गेल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून बिहार येथून त्याला ताब्यात घेण्यात आले. अधिक तपासात अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून त्यानेच सदर महिलेचा गळा आवळून खून केल्याचे कबूल केले. त्यानंतर पुणे पोलिसांनी त्याला अटक केली. इंदापुरात मुलाचं अभ्यास न करणं आईच्या जीवावर बेतलं मुलानं अभ्यास न करणं किती घातक ठरू शकतं, याचा प्रत्यय नुकताच एका घटनेत आला आहे. मुलानं अभ्यास न केल्याच्या कारणातून झालेल्या वादानंतर इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील एका विवाहित महिलेनं टोकाचं पाऊल उचललं आहेत. पतीशी वाद झाल्यानंतर संबंधित महिलेनं आपल्या राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येची ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Crime, Murder, Pune

पुढील बातम्या