पुण्यातील बड्या महिला नेत्याला कोरोनाची लागण, मंत्रालयातील बैठकीला अजित पवारही होते सोबत

पुण्यातील बड्या महिला नेत्याला कोरोनाची लागण, मंत्रालयातील बैठकीला अजित पवारही होते सोबत

काही दिवसांपूर्वी मंत्रालयात झालेल्या बैठकीला पुणे महापालिकेतील सर्वच पक्षांचे गटनेते उपस्थित होते.

  • Share this:

पुणे, 18 जून : पुण्यात कोरोनाचा कहर सुरू असतानाच महापालिकेतील विरोधी पक्षनेत्यांनाच कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी मंत्रालयात झालेल्या बैठकीला पुणे महापालिकेतील सर्वच पक्षांचे गटनेते उपस्थित होते. तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या बैठकीला होते.

मंत्रालयातील बैठकीनंतरच महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे इतर नेत्यांनाही आता काळजी घ्यावी लागणार आहे.

पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला

राज्यात कोरोना विषाणूचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात पुण्यात कोरोनाचा धोका कायम आहे. पुणे शहरात कोरोनाचे नवे हॉटस्पॉट समोर आले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 10 हजार पार गेला आहे.

पुण्यात वडारवाडी-पांडवनगर, जनवाडी-गोखलेनगर हे कोरोनाचे नवे हॉटस्पॉट समोर येताना दिसत आहेत. आठवडाभरात या भागात तब्बल 360 च्यावर कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक वार्ड ऑफिसर आणि पोलिसांनी या भागात तीन दिवसांची जनता संचारबंदी लागू केली आहे.

दुसरीकडे, पुणे महापालिकेने कोरोना कंटेंटमेंट झोनची फेररचना जाहीर केली आहे. शहरात 5 हजार दुकाने खुली झाली आहेत. गर्दी वाढत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी नियमांचं सक्तीने पालन करावं, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

पुण्यात आता 73 कंटेंटमेंट झोन जाहीर असतील. शहरात यापूर्वी 66 कंटेंटमेंट झोन होते. पूर्वीच्या 66 पैकी 24 वगळले तर 32 नव्याने वाढले तर 11 कंटेंटमेट झोनची फेररचना केली गेली आहे. पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी ही माहिती दिली. शहराच्या आता सर्वच भागात हे कोरोनाबाधित झोन असणार आहेत.

संपादन - अक्षय शितोळे

First published: June 18, 2020, 4:42 PM IST

ताज्या बातम्या