मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

संतापजनक : पुण्यातील सैतान वडिलांकडून पोटाच्या जुळ्या मुलींवर अत्याचार!

संतापजनक : पुण्यातील सैतान वडिलांकडून पोटाच्या जुळ्या मुलींवर अत्याचार!

नात्यांना काळिमा फासणारी एक संतापजनक घटना पुण्यामध्ये (Pune) उघड झाली आहे. या प्रकरणात एका व्यक्तीवर त्याच्या पत्नीनंच सख्या जुळ्या मुलीवर चार वर्षांपासून अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली आहे.

  • Published by:  News18 Desk

पुणे, 15 जानेवारी : नात्यांना काळिमा फासणारी एक संतापजनक घटना पुण्यामध्ये (Pune) उघड झाली आहे. या प्रकरणात एका व्यक्तीवर त्याच्या पत्नीनेच सख्या जुळ्या मुलीवर (Twin daughters) चार वर्षांपासून अत्याचार केल्याची तक्रार पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. या प्रकरणातील पीडित मुली या अल्पवयीन असल्याची माहिती आहे.

काय आहे प्रकरण?

या प्रकरणात पीडित मुलींच्या आईनं केलेल्या तक्रारीनुसार आरोपीचा फॅब्रीकेशनचा व्यवसाय आहे. जून 2020 पासून ही महिला आपल्या पतीपासून वेगळी राहते. या महिलेनं केलेल्या तक्रारीनुसार, ‘चार वर्षांपूर्वी 2016 साली त्यांच्या मुलीचं पोट दुखत होतं. त्यावेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सोनोग्राफी (Sonography)  करण्यात आली. त्यावेळी आरोपीनं तो रिपोर्ट मुलीच्या आईच्या हातामधून हिसकावून घेऊन जाळून टाकला होता.

काही वर्षांपूर्वी ही महिला मुलीसोबत घरातील बेडरुममध्ये झोपली होती. तर तिचा नवरा हॉलमध्ये झोपला होता. त्यावेळी रात्री उशीरा मुलीच्या रडण्याचा आवाज हॉलमधून आला. तो आवाज ऐकून ती महिला मुलीजवळ गेली. त्यावेळी ‘वडिलांनी आपल्यासोबत घाणेरंड कृत्य केलं’, असं मुलीनं सांगितलं होतं, अशी तक्रार देखील या महिलेनं केली आहे.

त्यानंतर ‘पीडित मुलीच्या बहिणीनं देखील वडिल घरामध्ये आई नसताना आपल्याशी घाणेरडं कृत्य करत असल्याचं सांगितलं.  गेल्या चार वर्षांपासून हा प्रकार सुरु होता. याची कुठे वाच्यता केली तर आरोपीनं सर्वांना जीवे मारण्याची धमकी दिली होती,’’ असा आरोपही त्या महिलेनं तक्रारीमध्ये केला आहे.

या विषयावर अनेकदा समजवल्यानंतरही आरोपी सुधारला नाही. त्यामुळे नवरा-बायकोमध्ये भांडणं वाढली. जून 2020 मध्ये आरोपी सर्वांना सोडून वेगळा झाला. या महिलेच्या तक्रारीनंतर तिच्या नवऱ्यावर बलात्कार तसंच बाल अत्याचाराच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First published:

Tags: Crime news, Pune crime