मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुणे : धावत्या रेल्वेतून पडली महिला अन्..., अंगावर काटा आणणारा Video

पुणे : धावत्या रेल्वेतून पडली महिला अन्..., अंगावर काटा आणणारा Video

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या नादात एक महिला घसरून रेल्वे प्लॅटफॉर्मवर पडली.

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या नादात एक महिला घसरून रेल्वे प्लॅटफॉर्मवर पडली.

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या नादात एक महिला घसरून रेल्वे प्लॅटफॉर्मवर पडली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune (Poona) [Poona], India

पुणे, 5 जानेवारी :  पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या नादात एक महिला घसरून रेल्वे प्लॅटफॉर्मवर पडली. मात्र यावेळी कर्तव्यावर असलेल्या रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे या महिलेला जीवदान मिळाले आहे. या पोलीस कर्मचाऱ्याने  मोठ्या शिताफीने या महिलेचा जीव वाचवला. पुणे रेल्वे स्थानकात घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

कॉन्स्टेबलच्या सतर्कतेमुळं वाचला जीव   

ही घटना तीन जानेवारी रोजीची आहे. एका महिलेने आपल्या पती आणि मुलीसह धावत्या प्रगती एक्स्प्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. तीचा पती आधी ट्रेनमध्ये चढला. नंतर या महिलेले आपल्या मुलीलाही ट्रेनमध्ये चढवले. मात्र ती स्वत: चढत असताना तिचा तोल गेला आणि ती  प्लॅटफॉर्मवर व रेल्वेच्यामध्ये पडली. ही घटना तिथे जवळच असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या लक्षात आली. त्याने मोठ्या शिताफीने या महिलेला बाजूला करत तीचा जीव वाचवला. विनोदकुमार मीना असं या दक्ष कर्मचाऱ्याचं नाव आहे. या कामगिरीबद्दल विनोदकुमार मीना यांचं सर्व स्थरातून कौतुक होत आहे.

First published:

Tags: Pune, Pune news, Train accident, Video, Viral video.