पुणे, 28 मे: पुणे शहरात (Pune City) गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत सातत्याने घसरण होताना दिसत आहे. त्यामुळे आता पुणे मनपाने शहरातील वीकेंड लॉकडाऊन रद्द (Pune Weekend lockdown cancelled) करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्मयामुळे आता पुण्यातील दुकाने ही सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. वीकेंड लॉकडाऊन रद्द करण्याचा निर्णय जरी पुणे महानगरपालिकेने घेतला असला तरी इतर सर्व निर्बंध हे अद्यापही कायम राहणार आहेत.
खालील दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 7 ते 11 सुरू राहणार
किराणा, भाजीपाला, फळ विक्री दुकाने, डेअरी, बेकरी, मिठाई आणि सर्व प्रकारची खाद्यपदार्थांची दुकाने (मटन, चिकन, अंडी, मासे विक्रीची दुकाने)
कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना (बियाणे, खते, उपकरणे आणि त्यांच्याशी संबंधित देखभाल व दुरुस्तीच्या सेवा)
पाळीव प्राणी खाद्याची दुकाने
पावसाळ्याच्या हंगामाकरिता नागरिक अथवा संस्थांसाठी साहित्याची निर्मिती करणारी दुकाने
चष्म्याची दुकाने
उर्वरित अत्यावश्यक सेवा. या दिनांक 14 एप्रिल 2021 व वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशानुसार सुरू राहतील.
मोठी बातमी! रुग्णालयाच्या प्रत्येक बिलाची तपासणी होणार, ऑडिटर नेमण्याचे आदेश
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही ट्विट करत माहिती दिली की, पुणे मनपा हद्दीत शनिवार आणि रविवारीही अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू राहणार आहेत. या संदर्भातील मागणी आढावा बैठकीत केली असता त्यानुसार निर्णय घेण्यात आला आहे. किराणा, भाजीपाला, दूध, बेकरी अशा आस्थापनांचा यामध्ये समावेश असेल.
पुणे मनपा क्षेत्रात कोविड 19 च्या प्रसारास प्रतिबंधित करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार असल्याचंही मनपाने स्पष्ट केलं आहे.
कोविड 19 च्या प्रतिबंधासाठी पुणे मनपाद्वारे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती कायदा 2005 चे कलम 51 ते 60 तसेच भारतीय दंड संहितेचे कलम 188 नुसार अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कार्यवाहीस पात्र राहील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Lockdown, Pune