मराठी बातम्या /बातम्या /पुणे /मुंबई, नाशिक, पुणेकरांनो काळजी घ्या; हवामान विभागाने दिला नवा इशारा

मुंबई, नाशिक, पुणेकरांनो काळजी घ्या; हवामान विभागाने दिला नवा इशारा

लहरी हवेची झलक हल्ली सततच आपल्याकडे दिसते आहे. पुढचे दोन दिवस मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई-ठाण्यात त्याचा अनुभव येईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. काळजी घ्या, पुन्हा एकदा हवेचा नूर बदलणार आहे.

लहरी हवेची झलक हल्ली सततच आपल्याकडे दिसते आहे. पुढचे दोन दिवस मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई-ठाण्यात त्याचा अनुभव येईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. काळजी घ्या, पुन्हा एकदा हवेचा नूर बदलणार आहे.

लहरी हवेची झलक हल्ली सततच आपल्याकडे दिसते आहे. पुढचे दोन दिवस मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई-ठाण्यात त्याचा अनुभव येईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. काळजी घ्या, पुन्हा एकदा हवेचा नूर बदलणार आहे.

  मुंबई, 5 फेब्रुवारी: लहरी हवेची झलक हल्ली सततच आपल्याकडे दिसते आहे. दोन दिवस चांगला गारठा जाणवत असतानाच वारे वाहू लागतात आणि ढग जमा होतात. पुन्हा एकदा आकाश झाकोळून थंडी पळून जाते. या वर्षी राज्यात कडाक्याची थंडी अशी सलगपणे पडलेलीच नाही. पण पुढचे दोन दिवश काळजी घ्या, पुन्हा एकदा हवेचा नूर बदलणार आहे. IMD चे मुंबई विभागाचे प्रमुख के. एस. घोसाळीकर यांनी Tweet करून मुंबई, पुणे आणि नाशिक परिसरातल्या तापमानात बदल होणार असल्याची माहिती दिली आहे. काळजी घ्या, अशा इशाराही दिला आहे.

  होसाळीकर यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, पुढचे दोन दिवस तापमानात घट होण्याची शक्यता आहे. ही कदाचित राज्यासाठी या हंगामातली शेवटची थंडीची लाट असू शकते. त्यामुळे होसाळीकर यांनी लिहिलं आहे की, काळजी घ्या आणि आनंदही घ्या. राज्यात 6 ते 8 फेब्रुवारीदरम्यान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी पारा एक आकडी असू शकतो. म्हणजे 10 अंशाच्या खालीही जाण्याची शक्यता आहे.

  मुंबई, ठाण्यात किती असेल तापमान

  मुंबईकर आणि ठाणेकरांनाही पुढचे दोन दिवस गुलाबी थंडी एंजॉय करण्याची संधी मिळू शकते. कारण IMD च्या GFS मॉडेलने दिलेल्या अंदाजानुसार पुढचे दोन दिवस किमान तापमान 15 अंशापर्यंत खाली उतरण्याची शक्यता आहे. नाशिक आणि पुण्यात पारा अर्थातच आणखी घसरणार आहे.

  पुणेकरांना थंडीची हुल

  जानेवारी महिना म्हटलं, की डोळ्यांसमोर येते ती हाडं गोठणारी थंडी. मात्र, यंदा पुण्यात आक्रीतच घडलं (January Temprature In Pune) आहे. जानेवारीतही पुणेकरांना गुलाबी थंडीचा आनंद घेता आला नाही आणि विशेष म्हणजे यंदाचा जानेवारी महिना पुणेकरांसाठी गेल्या 41 वर्षांतील सर्वाधिक उबदार (warmest January In Pune) गेला.

  वाचा - जानेवारीतही पुणेकर गुलाबी थंडीविना, तापमानानं गाठला 41 वर्षांतील उच्चांक

  गेल्या महिन्याभरात पुण्यात किमान तापमानाची नोंद 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाली नाही, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. गेल्या महिन्यात  28 जानेवारीला किमान तापमान12.3 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं आहे. गेल्या 41 वर्षांत पहिल्यांदाच जानेवारीत किमान तापमानाचा पारा 12 अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे.

  साल 1980 पासून पुण्यात जानेवारी महिन्यात किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या पुढे फक्त 3 वेळा म्हणजेच 1988 मध्ये 10.2, 2007 मध्ये 10.3 आणि 2021 मध्ये 12.3 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं आहे. जानेवारी हा पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्रात थंडीचा महिना म्हणून ओळखला जातो. काही वर्षी तर पुण्यातील किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला होता. 1994 मध्ये 4.4, 1997 आणि 2006मध्ये 4.7, 1984 मध्ये 5.1 आणि 2011 मध्ये 5.3 अंश सेल्सिअस इतका पारा नोंदवला गेला होता.

  First published:

  Tags: Mumbai, Nashik, Pune, Todays weather, Weather, Weather update, Winter