मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

बंदुकीच्या गोळ्यांनी पुणे हादरलं; क्षुल्लक कारणावरुन भररस्त्यात एका तरुणाची हत्या

बंदुकीच्या गोळ्यांनी पुणे हादरलं; क्षुल्लक कारणावरुन भररस्त्यात एका तरुणाची हत्या

Pune Paud Firing : भररस्त्यात गोळ्या झाडल्याचा प्रकार घडल्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

Pune Paud Firing : भररस्त्यात गोळ्या झाडल्याचा प्रकार घडल्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

Pune Paud Firing : भररस्त्यात गोळ्या झाडल्याचा प्रकार घडल्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

Pune Firing one dead : पुणे, 1 मार्च : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील पौड येथे किरकोळ कारणावरुन बंदुकीच्या गोळ्या (Pune Firing) झाडल्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात एका तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. पुण्याच्या जवळील पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत केवळ रस्त्यावरून येण्या-जाण्याच्या क्षुल्लक  कारणावरून थेट बंदुकीतून गोळ्या झाडण्यात आला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.

या प्रकरणात अजय रागू साठे या 40 वर्षीय व्यक्तीची हत्या झाली असून या प्रकरणात पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune was shaken by firing The murder of a young man for insignificant reasons). पुण्यासारख्या भागात यामुळे चिंता वाढली आहे. भररस्त्यात गोळ्या झाडल्याचा प्रकार घडल्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या प्रकरणात अद्याप अधिक माहिती हाती येऊ शकलेली नाही.

हे ही वाचा-पुणे विद्यापीठातील मुलांच्या वसतिगृहाजवळ आढळला किंग कोब्रा; थरारक रेस्क्यू VIDEO

दरम्यान पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. पुण्याचे महापौर यांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीबद्दल आणि त्यासंदर्भात केल्या जाणाऱ्या कारवाईबाबत माहिती दिली. महापौर मुरलीधर मोहोळ  यांनी असे म्हटले आहे की, 14 मार्चपर्यंत या शहरातील सर्व महाविद्यालयं, शाळा कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात येत आहेत. शिवाय रात्री अकरा ते सकाळी सहापर्यंत जे संचार निर्बंध आहेत, ते देखील 14 मार्चपर्यंत कायम ठेवण्यात आले आहेत. कोरोनाचे संक्रमण रोखता येईल, त्यावर नियंत्रण ठेवता येईल या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे महापौर म्हणाले.

First published:

Tags: Crime, Gun firing, Pune