मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

Cyclone Tauktae Pune : तळेगाव परिसरात विजांचा कडकडाट, जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी, पाहा VIDEO

Cyclone Tauktae Pune : तळेगाव परिसरात विजांचा कडकडाट, जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी, पाहा VIDEO

Pune cyclone tauktae effect पुण्याच्या काही भागात वातावरणात बदल झाल्याचं पाहायला मिळालं. याठिकाणी वेगाने वारे वाहत असल्याचं पाहायला मिळालं. परिसरामध्ये वीजदेखिल गुल झाल्याचं दिसून आला.

Pune cyclone tauktae effect पुण्याच्या काही भागात वातावरणात बदल झाल्याचं पाहायला मिळालं. याठिकाणी वेगाने वारे वाहत असल्याचं पाहायला मिळालं. परिसरामध्ये वीजदेखिल गुल झाल्याचं दिसून आला.

Pune cyclone tauktae effect पुण्याच्या काही भागात वातावरणात बदल झाल्याचं पाहायला मिळालं. याठिकाणी वेगाने वारे वाहत असल्याचं पाहायला मिळालं. परिसरामध्ये वीजदेखिल गुल झाल्याचं दिसून आला.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 14 मे : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तॉक्ते चक्रीवादळामुळं (Cyclone Tauktae ) राज्यात प्रामुख्यानं किनारपट्टीच्या भागामध्ये तडाखा बसणार आहे. हवामान विभागाकडून (Weather Forecast) तसा अंदाज (Weather Forecast) वर्तवण्यात आला आहे. मात्र राज्यात इतरही काही भागांत त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. पुण्याच्या तळेगाव (Pune Talegaon) परिसरात शुक्रवारी सायंकाळी अचानक जोरदार वीजेच्या ( thundering, lightning) कडकडाटासह पाऊस झाला. फेसबूकवर एका यूझरनं या पावसाचं वादळी रूप शेअर केलं.

(वाचा-वादळांना नावं कशी दिली जातात? 'तॉक्ते'चा नेमका अर्थ काय?)

तॉक्ते चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर थेट धडकणार नसलं तरी, किनारी भागामध्ये याचा तडाखा बसणार असल्याचा अंदाज आहे. त्यानुसार रविवारी आणि सोमवारी म्हणजे 16 आणि 17 मे रोजी राज्यात किनारपट्टीच्या भागांत याचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वीच पुण्याच्या काही भागात वातावरणात बदल झाल्याचं पाहायला मिळालं. याठिकाणी वेगाने वारे वाहत असल्याचं पाहायला मिळालं. परिसरामध्ये वीजदेखिल गुल झाल्याचं दिसून आला. वीजांचा कडकडाट आणि जोरदार बरसणारा पाऊस असंच चित्र याठिकाणी बराचवेळ पाहायला मिळालं.

तॉक्ते चक्रीवादळ 16 आणि 17 मे रोजी महाराष्ट्र किनारपट्टीच्या जवळ असेल त्यावेळी वादळ तीव्र ते अतितीव्र स्वरूपात असेल. कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना चक्रिवादळाचा तडाखा बसणार आहे. यावेळी वाऱ्यांचा वेग ताशी 62 ते 91 किमी राहण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतीतील लक्षद्वीप बेटांजवळ तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. पुढील 24 तासांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होणार आहे. चक्रीवादळ 18 मे रोजी गुजरात किनारपट्टीजवळ धडकण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

(वाचा-सरकारची भूमिका योग्यच होती, भाजपची टीका द्वेष भावनेतून; सचिन सावंतांचा घणाघात)

भारताच्या भौगोलिक अथवा सागरी क्षेत्रात निर्माण होणार्‍या चक्रीवादळांना नावं देताना भारतीय हवामान खातं भारतीय उपखंडातल्या इतर देशांच्या वेधशाळांशी संपर्क करतं. भारताच्या झोनमध्ये ओमान, पाकिस्तान, मालदीव, श्रीलंका, बांग्लादेश, म्यानमार, थायलँड हे देश आहेत. यांच्याशी संपर्क करून सर्वांच्या संमतीनं एखादं नाव निश्चित केलं जातं.

'तॉक्ते' नाव कोणी दिलं?

हे चक्रीवादळ 2021 वर्षातील पहिलं चक्रीवादळ असणार आहे. याचे नाव तॉक्ते (Tauktae) ठेवण्यात आलं आहे. या चक्रीवादळाचं नाव म्यानमारने ठरवले आहे. तॉक्ते याचा अर्थ मोठा आवाज करणारी पाल असा होतो. गुजरातबरोबरच गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ आणि लक्षद्वीपला या वादळाचा फटका बसू शकतो.

First published:

Tags: Cyclone, Pune, Rain