Home /News /pune /

BREAKING : उद्यापासून पुणे अनलॉक, दुकानं 8 पर्यंत खुली राहणार; अजित पवारांची मोठी घोषणा

BREAKING : उद्यापासून पुणे अनलॉक, दुकानं 8 पर्यंत खुली राहणार; अजित पवारांची मोठी घोषणा

 पुण्यात आता दुकानं सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. हॉटेल आणि रेस्टारंट रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

पुण्यात आता दुकानं सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. हॉटेल आणि रेस्टारंट रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

पुण्यात आता दुकानं सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. हॉटेल आणि रेस्टारंट रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

पुणे, 08 ऑगस्ट : राज्यात कोरोनाची (corona case) लाट ओसरल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. पण पुण्यात (pune corona rules) निर्बंध कायम ठेवण्यात आले होते. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. अखेर पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी बैठक घेऊन निर्बंध शिथिल करण्याची घोषणा केली आहे. पुण्यात आता दुकानं सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. हॉटेल आणि रेस्टारंट रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. पुण्यातील मॉल सुद्धा सुरू करण्यात आले असून रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. मात्र, लशीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना परवानगी दिली जाणार आहे, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

VIDEO: अंड्यामध्ये Fanta मिसळून बनवलं ऑमलेट; ही डिश नेमकी काय?

तसंच,  ग्रामीण भागात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे. , मास्क वापरणे, दुकानं आणि मॉलमधील कर्मचाऱ्यांचे लसीकरण बंधनकारक असणार आहे. जर पॉझिटिव्ह रेट जर 7 टक्क्यांच्या पुढे गेला तर पुन्हा एकदा निर्बंध लावले जातील, असा इशाराही अजित पवारांनी दिला. पुण्यात असे आहे नियम - सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु राहणार - हॉटेल रात्री १० पर्यंत सुरु ठेवता येणार  - मॉल रात्री ८ पर्यंत सुरू ठेवता येणार, लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश - राज्याप्रमाणे पुण्यात सुद्धा मंदिरं बंद राहणार - गणेशोत्सवाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेणार - दुकानातील कर्मचाऱ्यांना लशीचे दोन डोस बंधनकारक - मास्क वापरणे सक्तीचे 'आम्हाला निर्णय घेण्यात अजिबात हौस नाही. ज्या ठिकाणी गर्दी जमते तिथे कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहे. त्यामुळे निर्णय घ्यावे लागतात. पण आता कुणी पुण्याचं काही विचारलं तर सांगा पालकमंत्री निर्णय घेतील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून मीच निर्णय घेणार आहे, प्रस्ताव पाठवण्याची काही गरज नाही, असं अजित पवारांनी सांगितलं. तसंच, व्यापाऱ्यांनी हे असं करायला नको होतं. त्यांना माहिती आहे, हे हौसेने आम्ही करत नाही.  सरकारचा महसूल बुडतो. पण लोकांचे जीव महत्वाचे आहेत, ज्या ठिकाणी गर्दी जमते तिथे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढते. पुण्यात कोरोनाची लाट आली होती तेव्हा दोनच लॅब आपल्याकडे होत्या. ऑक्सिजन सुद्धा बाहेरून मागावे लागले होते, असंही अजित पवार म्हणाले.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Ajit pawar, Pune, Pune news

पुढील बातम्या