पुण्यात लॉकडाऊन उघडला, पण निर्माण झाला नवा संघर्ष; व्यापाऱ्यांनी अजित पवारांना लिहिलं पत्र

पुण्यात लॉकडाऊन उघडला, पण निर्माण झाला नवा संघर्ष; व्यापाऱ्यांनी अजित पवारांना लिहिलं पत्र

पुण्यातच हे निर्बंध का कायम ठेवले जाता आहेत? असा सवालच पुणे व्यापारी महासंघाने उपस्थित केला आहे.

  • Share this:

पुणे, 3 ऑगस्ट : पुण्यात पी1 पी 2 च्या निर्बंधाविरोधात व्यापारी महासंघ पुन्हा आक्रमक झाला आहे. राज्य शासनाचे आदेश असूनही अकोल्याचे कलेक्टर पी1, पी2चे निर्बंध शिथिल करत असतील तर मग पुण्यातच हे निर्बंध का कायम ठेवले जाता आहेत? असा सवालच पुणे व्यापारी महासंघाने उपस्थित केला आहे.

1 ऑगस्टपासून पुण्यातील कोरोना लॉकडाऊन उठवण्यात आलं आहे. पण 29 जुलैच्या शासन निर्देशासानुसार पुण्यासह इतर सात शहरांमध्ये पी1, पी2 चे निर्बंध कायम आहेत. म्हणूनच व्यापाऱ्यांना एकाच रोडवरील दुसऱ्या बाजूची दुकानं एक दिवसाआड बंद ठेवावी लागत आहेत. अकोल्यात मात्र तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत:च्या अधिकारात पी1, पी2 चे निर्बंध रद्द करून टाकले आहेत. मग हाच न्याय पुण्यासह इतर शहरांना का लागू होत नाही, असा सवाल पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी 'न्यूज 18 लोकमत 'शी बोलताना उपस्थित केला आहे. 

दरम्यान, पी1 पी2 चे निर्बंध पथारीवाल्यांना का लागू नाहीत, असाही सवाल रांका उपस्थित करतात. यावर आम्ही पथारीवाल्यांची बाजूही जाणून घेतली असता त्यांनी मनपा आयुक्तांचा आदेशच समोर आणला, तसंच आमची आणि व्यापाऱ्यांची तुलनाच होऊ शकत नाही, आमचं हातावरचं पोट आहे, तुम्हीच सांगा, आम्ही जगायचं तरी कसं?  अशी भूमिका पुणे पथारीवाले संघटनेचे कार्याध्यक्ष जितेंद्र पायगुडे यांनी मांडली आहे.

पुण्यात कोरोनाच्या साथीमुळे गेली चार महीने व्यापाऱ्यांचा धंदा बंद होता.आता कुठे तो सुरू झाला आहे. पण त्यातही शासनाने पी1पी2चे निर्बंध कायम ठेवल्याने दुकानदार पुरते  वैतागले आहेत. पुण्यात तर स्थानिक अधिकारीही ही अट रद्द करायला तयार आहेत. पण मुख्य सचिवांच्या एका आदेशामुळे ते शक्य नाही. म्हणूनच अजित पवारांनीच हा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी व्यापारी करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Published by: Akshay Shitole
First published: August 3, 2020, 5:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading