पुणे, 08 ऑगस्ट : कोरोनाबाधित (corona patient) रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. आता पुण्यात (pune unlock) सुद्धा अनलॉक करण्याची घोषणा पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी केली आहे. त्यामुळे दुकानं रात्री ८ तर हॉटेल १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
राज्यात कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. तर मुंबईत दुकानं रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली. त्यामुळे पुण्यासाठी वेगळा नियम का, असा प्रश्न करत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर व्यापाऱ्यांनीही आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर आज अजित पवार यांनी बैठक घेऊन निर्बंध शिथिल करण्यात येत असल्याचे जाहीर केले.
पुण्यात असे आहे नियम
- सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु राहणार
- हॉटेल रात्री १० पर्यंत सुरु ठेवता येणार
- मॉल रात्री ८ पर्यंत सुरू ठेवता येणार, लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश
- राज्याप्रमाणे पुण्यात सुद्धा मंदिरं बंद राहणार
- गणेशोत्सवाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेणार
- दुकानातील कर्मचाऱ्यांना लशीचे दोन डोस बंधनकारक
- मास्क वापरणे सक्तीचे
तसंच, ग्रामीण भागात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे. , मास्क वापरणे, दुकानं आणि मॉलमधील कर्मचाऱ्यांचे लसीकरण बंधनकारक असणार आहे. जर पॉझिटिव्ह रेट जर 7 टक्क्यांच्या पुढे गेला तर पुन्हा एकदा निर्बंध लावले जातील, असा इशाराही अजित पवारांनी दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, Pune, Pune news