BREAKING : पुण्यात हॉटेल, रेस्तराँ, लॉजही सुरू होणार; नवी नियमावली केली जाहीर

BREAKING : पुण्यात हॉटेल, रेस्तराँ, लॉजही सुरू होणार; नवी नियमावली केली जाहीर

पुणे शहर पुन्हा खुलं होणार असून शहरासाठीची नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

  • Share this:

पुणे, 3 ऑगस्ट : पुण्यात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लादण्यात आलेले विविध निर्बंध उठवण्यास आता सुरुवात झाली आहे. पुण्यात 5 ऑगस्टपासून प्रतिबंधित क्षेत्र-कंटेन्मेंट झोन्स बाहेरील हॉटेल्स ,रेस्तराँ, लॉजेस मॉल ,व्यापारी संकुले नियम आणि अटी यांच्यासह सुरू होणार आहेत.

काही दिवसांच्या लॉकडाऊननंतर पुणे शहर पुन्हा खुलं होणार असून शहरासाठीची नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

हॉटेल व्यावसायिकांना परवानगी देण्यात असली तरी अनेक नियम आणि अटी लागू करण्यात आल्या आहेत. परिसरात गर्दी होऊ न देणे, नागरिकांना घ्यावयाच्या खबरदारीबाबत सतत माहिती देणे, फेस मास्क, हातमोजे कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देणे यासांरख्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्यावसायिकांना करावी लागणार आहे.

31 जुलै रोजीही अनलॉकबद्दल जारी करण्यात आला होता आदेश

याआधीच प्रतिबंधित क्षेत्रात-कंटेन्मेंट झोन्समध्ये अत्यावश्यक सुविधा पुरवणारी दुकाने (दूध विक्री,भाजीपाला ,किराणा,रेशन ) सकाळी 8 ते 12 आणि संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान उघडण्यास परवानगी देण्यात आली. त्याआधी केवळ सकाळी 8 ते 12 एवढीच या दुकानांना मुभा देण्यात आली होती.

1 ऑगस्टपासून काय बदल झाले होते?

- मेडिकल दुकाने, हॉस्पिटल मात्र त्यांच्या वेळेप्रमाणे खुली झाली

- प्रतिबंधित क्षेत्राबाहेरची दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 7 च्या दरम्यान p1 आणि p2 नियमाप्रमाणे उघडी झाली

- व्यापाऱ्यांची p1 वन p 2 रद्द करण्याची मागणी फेटाळली

- मॉल्स आणि व्यापारी संकुले 5 ऑगस्ट पासून सकाळी 9 ते 7

- मात्र मॉल्स मधील हॉटेल्स ,रेस्टरन्ट ,सिनेमागृहे बंदच

- हॉटेल्स, रेस्टरन्ट मधून खाद्यपदार्थ घरपोच पाठवता येतील

- प्रतिबंधित क्षेत्राबाहेर अत्यावश्यक सुविधा पुरवणारी दुकाने (दूध,भाजीपाला, किराणा ) सकाळी 9 ते सायंकाळी 7 या दरम्यान खुली राहतील।

- 5 ऑगस्ट पासून मोकळ्या मैदानात खेळावयाचे खेळ वगळता इतर खेळ जसे की गोल्फ,नेमबाजी,outdoor बॅडमिंटन ,टेनिस ,मल्लखांब सुरक्षित अंतर राखून खेळता येतील

- मात्र जलतरण तलाव बंदच राहतील

- टॅक्सी/cab मध्ये वाहन चालक अधिक 3 प्रवासी

- रिक्षामध्ये वाहनचालक अधिक 2 प्रवासी

- खाजगी चारचाकीमध्ये वाहनचालक अधिक 3 प्रवासी अशी मुभा राहील

- दुचाकीवर केवळ वाहनचालक मास्क आणि हेल्मेट परिधान करून परवानगी असेल

Published by: Akshay Shitole
First published: August 3, 2020, 9:43 PM IST

ताज्या बातम्या