मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुण्यात लस घेतल्यानंतरही अवघ्या 8 दिवसात दोघांना झाली कोरोनाची लागण, 'हे' आहे कारण

पुण्यात लस घेतल्यानंतरही अवघ्या 8 दिवसात दोघांना झाली कोरोनाची लागण, 'हे' आहे कारण

पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लस घेतल्यानंतर अवघ्या 8 दिवसात दोघांना कोरानाची लागण झाली आहे.

पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लस घेतल्यानंतर अवघ्या 8 दिवसात दोघांना कोरानाची लागण झाली आहे.

पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लस घेतल्यानंतर अवघ्या 8 दिवसात दोघांना कोरानाची लागण झाली आहे.

पुणे, 18 फेब्रुवारी : कोरोनाची लस टोचून घेतल्यानंतर अनेकजण सध्या विनामास्क निर्धोकपणे फिरू लागले आहेत. मात्र लस घेतल्यानंतरही कोरोना झाल्याच्या घटना पुढे येत आहेत. पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लस घेतल्यानंतर अवघ्या 8 दिवसात दोघांना कोरानाची लागण झाली आहे. या हॉस्पिटलचे डिन डॉ. मुरलीधर तांबे यांनीच 'न्यूज18 लोकमत'ला ही माहिती दिली आहे.

याबाबत डॉ. तांबे म्हणाले की, "केंद्रीय लसीकरण मोहिमेंतर्गंत ससून हॉस्पिटलमधील डॉक्टरांसहित सर्वच पॅरामेडिकल स्टाफला कोरोनाची लस दिली जात आहे. पण ही लस घेतलेल्यापैकीच दोघेजण कोराना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांना कोरोनाची लक्षणं आढळून आल्यानंतर त्यांची चाचणी केली असता हा प्रकार समोर आला आहे. सध्या या दोघांची प्रकृती स्थिर असून त्यांना होम क्वारन्टाइन करण्यात आलं आहे."

लसीकरणानंतरही का झाली कोरोनाची लागण?

या दोघांनाही सिरमची कोविशिल्ड ही लस देण्यात आली होती. पण कोरोनाची लस देऊनही पुन्हा कोरोनाची लागण झालीच कशी, असा सवाल उपस्थित झाला. याबाबत ससूनचे डिन डॉ. मुरलीधर तांबे यांनी विचारले असता त्यांनी असा प्रकार होऊ शकतो, असं सांगितलं. कारण कोरोनाची लस घेतली तरी त्याद्वारे शरीरात तयार होणारी रोग प्रतिकारक शक्ती ही दुसऱ्या डोसनंतर 15 दिवसांनी आपला प्रभाव दाखवते. त्यामुळे लस टोचून घेतली म्हणून लगेच काही मास्क वापरणं, हात सॅनिटाइज करणं किंवा सोशल डिस्टंट पाळणं लोकांनी सोडून देऊ नये, असं आवाहनही डॉ. तांबे यांनी केलं आहे.

तसंच कोरोना होऊन गेला म्हणून काही तुम्ही कायमचे स्वत:ला कोरोनापासून वाचवू शकत नाहीत. कारण कोरोनाच्या अँटीबॉडीज नेमक्या किती काळ शरीरात राहतात, याबाबत कुठंलेही ठोस निष्कर्ष अजून समोर आलेले नाहीत.

हेही वाचा - पुण्यात नवे CORONA HOTSPOTS; पुणेकरांनो सांभाळा नाहीतर...

दरम्यान, सध्याच्या कोरोना लसीकरण एसओपीनुसार, एखाद्या रूग्णाला कोरोना होऊन गेला असेल तर त्याला किमान तीन महिने कोरोनाची लस दिली जाऊ नये, असे निर्देश डॉक्टरांना देण्यात आले आहेत. पण एखाद्या रुग्णाला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण होण्याचे प्रकार आतापर्यंत खूपच तुरळक प्रमाणात आढळून आले आहेत. पण म्हणून काही तुम्हाला पुन्हा कोरोना होणारच नाही, असंही अजिबात नाही. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.

First published:
top videos

    Tags: Corona vaccine, Coronavirus, Pune (City/Town/Village)