पुण्यात भीषण अपघात! मद्यधुंद ट्रक चालकानं 5 जणांना उडवलं, दुचाकी नेल्या फरफटत

पुण्यात भीषण अपघात! मद्यधुंद ट्रक चालकानं 5 जणांना उडवलं, दुचाकी नेल्या फरफटत

पुण्यातील पिरंगुट घाट उतारावर भीषण रस्ते दुर्घटना घडली आहे. एका भरधाव ट्रकनं रस्त्यावरील वाहनांना धडक दिल्यानं तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

  • Share this:

पुणे, 11 सप्टेंबर : पुण्यातील पिरंगुट घाट उतारावर भीषण रस्ते दुर्घटना घडली आहे. एका भरधाव ट्रकनं रस्त्यावरील वाहनांना धडक दिल्यानं तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी (10 सप्टेंबर) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना आहे. पिरंगुट घाट उतारावर भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने रस्त्यावरील दुचाकींना जोरदार धडक देऊन पाच जणांना उडवलं. या दुर्घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. या ट्रक चालकानं दोन दुचाकींना अक्षरशः फरफटत नेल्याचीही माहिती समोर आली आहे.

(वाचा : 'ड्रग्स'च्या मोठ्या रॅकेटचा मुंबई ATSने केला पदार्फाश, 53 कोटींचा साठा जप्त)

या भीषण अपघातानंतर ट्रक चालक घाबरला आणि घटनास्थळावरून तो पळून जाण्याच्या तयारीत होता. पण सतर्क वाहतूक पोलिसांनी या ट्रक चालकाला घोटावडे फाटा येथे पकडलं. ट्रकचालक दारू पिऊन गाडी चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातातील मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.  याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

(वाचा :माजी महापौरांचा स्वाईन फ्लूने मृत्यू; H1N1 च्या या लक्षणांकडे दुर्लक्ष नको)

(वाचा :कॉलेजमध्ये ड्रग्ज देऊन केलं माझं लैंगिक शोषण, अभिनेत्रीच्या आरोपाने खळबळ)

LIVE VIDEO: उत्सवात दुर्घटना! मिरवणुकीदरम्यान इमारतीचं छत कोसळलं

First published: September 11, 2019, 8:42 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading