Home /News /pune /

Pune: खाकीवर्दीतले बजरंगबली.... वाहतूक कोंडीतून अपघातग्रस्त चिमुकलीला रुग्णालयात दाखल करुन दिली संजीवनी, पाहा VIDEO

Pune: खाकीवर्दीतले बजरंगबली.... वाहतूक कोंडीतून अपघातग्रस्त चिमुकलीला रुग्णालयात दाखल करुन दिली संजीवनी, पाहा VIDEO

खाकीवर्दीतले बजरंगबली.... अपघातग्रस्त चिमुकलीला रुग्णालयात दाखल करुन दिली संजीवनी, पुण्यातील VIDEO VIRAL

खाकीवर्दीतले बजरंगबली.... अपघातग्रस्त चिमुकलीला रुग्णालयात दाखल करुन दिली संजीवनी, पुण्यातील VIDEO VIRAL

Pune news: वाहतूक पोलीस कर्मचारी समीर बागसिराज यांनी वाहतूककोंडीतून मार्ग काढत चिमुकलीला वेळेवर रुग्णालयात दाखल केलं.

पुणे, 29 एप्रिल : राज्यात एकीकडे मशिदीवरील भोंग्याला घेऊन राजकारण करून राज्यात जाती जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातं आहे. मात्र एकीकडे असं असलं तरी माणुसकी एकच धर्म.... हिंदू - मुस्लिम भाई-भाई असा संदेश देणारे आणि ते प्रत्यक्षात आणणारे अनेक उदाहरणे आपला पाहायला मिळतात. असाच काहीसा प्रकार वारजे येथील पुलावर (Varje bridge Pune) घडला आहे. खरा तो एकची धर्मचा संदेश देत वाहतूक पोलीस समीर बागसिराज (Pune Traffic Police officer Sameer Bagasiraj) यांनी चिमुकलीला नवं संजीवनी दिली आहे. आंबेगावच्या दिशेने निघालेल्या कोथरूडमधील पुराणिक कुटुंबावर काळाने आघात केला. त्यांच्या चारचाकी मोटारीला एका ट्रकने मागील बाजूने धडक दिली. मुंबई-पुणे हायवेवरील वारजे भागातील पुलावर वाहनांची गर्दी झाली होती. मोटारीला मागून दिलेल्या धडकेमुळे दोन वाहनांमध्ये मोटार वाहन क्र. एमएच 12 ईटी 6635) दबली गेली. या अपघातामध्ये मनोज पुराणिक, त्यांच्या पत्नी, दोन मुली असा परिवार जखमी अवस्थेत मदतीच्या प्रतीक्षेत होता. परंतु अपघात झाल्याने महामार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली होती. या वहतूककोंडीतून रुग्णवाहिका वेळेवर पोहोचणे शक्यच नव्हते. वाचा : "..तर राज ठाकरेंची सभा उधळून लावणार", 'राज'गर्जना होण्यापूर्वी भीम आर्मीचा इशारा वाहतूक कोंडी झाल्यामुळे वारजे वाहतूक शाखेचे पोलीस घटनास्थळावर दाखल झाले खरे, पण गर्दी इतकी भयानक होती, की त्यांना देखील हालचाल करणे शक्य होत नव्हते. पण या अपघातप्रसंगी कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी समीर बागसिराज यांनी प्रसंगावधान दाखवले. अपघातात आठ वर्षीय मुलीला जास्त मार लागला होता. तिच्या जखमेतून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होत होता. हे पाहून समीर बागसिराज यांनी तातडीने अपघातग्रस्त चिमुकलीला क्षणात स्वत:च्या खांद्यावर घेऊन रुग्णालयाच्या दिशेने धावायला सुरुवात केली. त्यांच्या मदतीला राम नवले हे रिक्षाचालकही धावून आले. त्यामुळे चिमुरडी वेळेत उपचार घेऊ शकली. त्यांच्या या कार्यतर परतीचा गौरव म्हणून वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी त्यांचा सत्कार करत पोलीस निवडसाठी त्यांचे नाव पाठवणार असल्याची ही माहिती दिली.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Accident, Pune, Traffic police, Viral videos

पुढील बातम्या