पुणे, 15 जून: आयकर विभागात सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत असल्याची बतावणी करून एका जोडप्यानं (Couple) पुण्यातील एका व्यापाऱ्याला तब्बल 40 लाख रुपयांना गंडा (Fraud 40 lakh) घातला आहे. संबंधित आरोपी दाम्पत्यानं व्यापाऱ्याला दारु विक्रीचा परवाना (pretext of issuing liquor license) मिळवून देतो, अशी बतावणी करून फसवणूक (Financial Fraud) केली आहे. याप्रकरणी व्यापारी परमेश्वर कुचेकर यांनी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केली आहे. संबंधित आरोपी दाम्पत्य सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
शुभम गौर आणि रंजना गौर असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी दाम्पत्याचं नाव आहे. आरोपी आणि फिर्यादी व्यापारी मागील काही वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. फिर्यादीच्या एका जवळच्या मित्रानं आरोपीची शुभम गौर आयकर विभागात सहाय्यक आयुक्त असल्याची माहिती देऊन ओळख करून दिली होती. त्यानंतर आरोपी गौर आणि फिर्यादी कुचेकर चांगले मित्रही बनले होते. त्याचबरोबर आरोपीने आपल्या बायकोची देखील फिर्यादीशी ओळख करून दिली होती.
पुणे मिररने दिलेल्या वृत्तानुसार, फिर्यादी परमेश्वर कुचेकर हे जमीन विक्रीशी संबंधित काम करतात. त्याचबरोबर ते गाड्यांची खरेदी विक्रीचा व्यवसाय देखील करतात. दरम्यान आरोपीनं पुण्यात नवीन फ्लॅट खरेदी करायचा असल्याचं सांगत फिर्यादीकडे उसणे 15 लाख रुपये मागितले. त्याचबरोबर पुणे शहरात दारु विक्रीचा परवाना मिळवून देण्याचं आश्वासनही दिलं. त्यामुळे फिर्यादीनं आपल्या काही मित्रांकडून उसणे पैसे घेऊन आरोपीची मदत केली. यानंतर आरोपी वेगवेगळे आमिष दाखवून फिर्यादीकडून तब्बल 40.5 लाख रुपये घेतले.
हे ही वाचा-चोरीला गेलेलं 40 किलो सोनं अन् 6 कोटी सापडले पण मालकच झाला गायब; अजब गौडबंगाल
पण अलीकडेच कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे फिर्यादी आपल्या गावी जाऊन राहिले. पण ते जेव्हा पुण्यात परतले. तेव्हा आरोपींशी त्याचा संपर्क होऊ शकला नाही. आरोपी दाम्पत्य पुण्यातून फरार झाल्याचं लक्षात आल्यानंतर फिर्यादीनं तातडीनं शिवाजीनगर पोलीस ठाण्यात येऊन आरोपी दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संबंधित आरोपींनी अशाच पद्धतीनं अनेकांची फसवणूक केल्याची माहिती दिली आहे. पोलीस सध्या आरोपी दाम्पत्याचा शोध घेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Financial fraud, Pune