पुण्यात वादळी पावसाचा कहर; वादळाची भयानकता दाखवणारा VIDEO

पुण्यात वादळी पावसाचा कहर; वादळाची भयानकता दाखवणारा VIDEO

पुण्यात शुक्रवारी दुपारनंतर झालेल्या वादळी पावसात झाडं, होर्डिंगच नाही तर अख्खा मोबाईल टॉवर कोसळला. पाहा अंगावर शहारा येईल असा VIDEO

  • Share this:

पुणे,  1 मे : पुण्यात शुक्रवारी संध्याकाळनंतर आलेल्या वादळी पावसानं शहरात अक्षरशः थैमान घातलं. लॉकडाऊनमुळे रस्त्यावर फारशी रहदारी नसल्याने जीवितहानी झाली नाही. पण या काही मिनिटांच्या वादळी पावसाने काय नुकसान केलं आहे याचे VIDEO आणि फोटो आता समोर येत आहेत.

शहराच्या मध्यवस्तीत, तसंच उपनगरांमध्येसुद्धा जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला. विजांच्या कडकडाटासह आलेल्या या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. पण काही मिनिटांत या वाऱ्याने भीतीदायक नुकसान केलं. अनेक ठिकाणी झाडं पडली. अनेक घरांची तावदानं फुटली.

पुण्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ घातला त्यात शिवाजी नगरला दिशादर्शक कमान कोसळली. काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे झालेल्या अपघातात प्राणहानी झाली होती. ती घटना अजूनही पुणेकर विसरलेले नाहीत. आज लॉकडाऊनमुळे रस्त्यावर वर्दळ नव्हती. त्यामुळे या घटनेत जीवितहानी झाली नाही. मंगळवार पेठेत रहिवासी इमारतीवरचा टॉवर कोसळला. विविध दुर्घटनांचे अग्निशमन दलास तब्बल 60 कॉल्स आले. रस्त्यावर पडलेली झाडं उचलण्याचं काम सुरू आहे.

मंगळवार पेठेत सदानंद नगरजवळ पारगे चौक इथे एक ट्रान्समिशन टॉवर कोसळला. त्याचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

लॉकडाऊन वाढविल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देशवासियांशी संवाद साधणार

सगळ्यात मोठी बातमी, आणखी दोन आठवड्यांनी वाढला Lockdown

First published: May 1, 2020, 7:13 PM IST

ताज्या बातम्या