Home /News /pune /

Pune: रिक्षातून आले अन् दुकानात शिरले, अवघ्या 3 मिनिटांत अख्खच्या अख्ख कपड्याचं दुकान केलं साफ, घटना CCTV मध्ये कैद

Pune: रिक्षातून आले अन् दुकानात शिरले, अवघ्या 3 मिनिटांत अख्खच्या अख्ख कपड्याचं दुकान केलं साफ, घटना CCTV मध्ये कैद

Pune: रिक्षातून आले अन् अवघ्या 3 मिनिटांत अख्ख कपड्याचं दुकान केलं साफ, घटना CCTV मध्ये कैद

Pune: रिक्षातून आले अन् अवघ्या 3 मिनिटांत अख्ख कपड्याचं दुकान केलं साफ, घटना CCTV मध्ये कैद

cloth shop within 3 minutes caught in cctv: पुणे जिल्ह्यातील देहूरोड परिसरात चोरट्यांनी एका कपड्याच्या दुकाना चोरी केली आहे. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

    गणेश दुडम, प्रतिनिधी पुणे, 2 फेब्रुवारी : चोरट्यांनी पुणे जिल्ह्यातील (Pune district) देहूरोड परिसरात एका कपड्याच्या दुकानात चोरी (theft in cloth shop) केली आहे. येथील आबूशेट रोडवरील फॅशन पॉईंट या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी कपड्याचे दुकान लुटले. ब्रँडेड कपडे असलेल्या या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले आहेत. दुकानाबाहेरील सीसीटीव्हीत दिसत आहे की, आरोपी एका रिक्षातून आले आणि दुकानाचे शटर उचकून आत प्रवेश केला. (Cloth shop looted in Dehuroad area, incident caught in CCTV) मध्यरात्री तीनच्या सुमारास एका रिक्षातून पाच चोरटे उतरले आणि या दुकानात शिरले. गल्ल्यातील काही रोख रक्कम आणि 70 हजाराचे कपडे घेऊन हे चोर लंपास झाले. मात्र या चोरट्यांचे कारनामे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाली असून आता पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत. चंद्रपुरात बँक ऑफ इंडियाच्या शाखेत चोरी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात बँक ऑफ इंडिया शाखेत दिवसाढवळ्या चोरी झाली आहे. चोरट्यांनी बँकेत सर्व कर्मचारी उपस्थित असतांना 16 ते 17 लाखांची रक्कम लांबविली. 31 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान बँकेत 2 व्यक्ती शिरल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून दिसत आहे. कॅशिअर मॅनेजरच्या केबिनमध्ये कामानिमित्त गेल्याची संधी साधून चोरट्यांनी केबिनमध्ये शिरत थेट टेबलवरून ही रक्कम लांबवली. 500 आणि 200 च्या नोटांचे बंडल पिशवीत टाकून चोरांनी साळसूदपणे बँकेबाहेर पोबारा केला. बाजारपेठ आणि बँकेत असलेल्या सीसीटीव्हीमध्ये 2 संशयित आरोपींसोबत एक तरुणीही कैद झाली आहे. वाचा : 300 कोटींच्या बिटकॉईसाठी पोलीस कर्मचाऱ्यानेच केलं व्यापाऱ्याचं अपहरण पेट्रोल दिलं नाही म्हणून बीडमधील तरुणांचा पेट्रोल पंपावर राडा बीडमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. मध्यरात्री पेट्रोल पंप बंद असल्याने पेट्रोल मिळालं नाही म्हणून दोन तरुणांनी पेट्रोल पंपावर प्रचंड राडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हा सर्वप्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दोन तरुणांनी पेट्रोल पंपावर किती भयानकप्रकारे हैदोस घातला ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये बघायला मिळतंय. संबंधित माजखोर तरुण हे पेट्रोल भरण्याचं नोडल जमिनीवर आपटतात. ही बीडच्या माजलगाव शहरातील करवा पेट्रोल पंपावर घडली. ही घटना रात्री 12 ते 1 वाजेच्या दरम्यान घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. या तोडफोडीमध्ये मीटर आणि काचांचं नुकसान झालं आहे. तोडफोड करणाऱ्या तरुणांचा राडा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Cctv footage, Crime, Pune

    पुढील बातम्या