S M L

भरवर्गात शिक्षिकेनं विद्यार्थ्याचे कापले केस !

वर्गातील इतर मुलांनी यावरून चिडवल्याने आणि भर वर्गात केस कापल्याने अपमानास्पद वाटून मुलाने शाळेत जायचा धसका घेतलाय.

Updated On: Jul 20, 2018 08:09 PM IST

भरवर्गात शिक्षिकेनं विद्यार्थ्याचे कापले केस !

अद्वैत मेहता,पुणे, 20 जुलै : पुण्यातील विश्रांतवाडी येथील पुणे इंटरनॅशनल स्कूलमधील एका शिक्षिकेने सहावीतील आर्यन वाघमारे या मुलाचे केस वाढले तो कापत नाही म्हणून स्वत: शिक्षिकेनेच कात्रीने कापल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या आधीही या शिक्षिकेने आर्यनची वेणी बांधली होती. वर्गातील इतर मुलांनी यावरून चिडवल्याने आणि भर वर्गात केस कापल्याने अपमानास्पद वाटून मुलाने शाळेत जायचा धसका घेतलाय.

हुलगेश चलवादीया काँग्रेस पक्षाच्या मातब्बर कार्यकर्त्याच्या पुणे इंटरनॅशनल स्कूल मधील 6 वीत शिकणाऱ्या आर्यन वाघमारे याने केस न कापल्याने श्वेता गुप्ता या शिक्षिकेने प्रथम पोनी बांधली नंतर कात्रीने पुढचे केस कापले. भर वर्गात अर्धवट केस कापल्याने वर्गाती मुलांनी आर्यनची चेष्टा करायला सुरूवात केली. आर्यनही घरी जाऊन आईला टक्कल कर,शाळेत न पाठवू नको म्हणत व्यथा व्यक्त केली.

राहुल गांधींचा मास्टर स्ट्रोक : 'गळा भेट' आणि 'डोळा भेट'


आदिती वाघमारे यांनी याप्रकरणी मुख्याध्यापिकांना जाब विचारला असता श्वेता गुप्ता यांनी असा प्रकार आणखी 4 विद्यार्थ्यांबाबत केल्याचं खुद्द मुख्याध्यापिकेने सांगितलं मात्र तुमचीच तक्रार आली असं धक्कादायक उत्तर दिलं मग मात्र आदिती यांनी पोलीस स्टेशन गाठलं.

पंतप्रधानपदाची आब राखा, सुमित्रा महाजन यांची राहुल गांधींना समज

पोलिसी कारवाईच्या भीतीने म्हणा किंवा गांभीर्य समजल्याने संस्थाचालक हुलगेश चलवादी यांनी संबंधित शिक्षिकेला निलंबित केलं आणि चौकशी सुरू केली भविष्यात असं घडू नये म्हणून सर्व शिक्षकांसाठी समुपदेशन शिबिर आयोजित केल्याचं सांगितलं.

Loading...

राहुल गांधींनी नेमका कुणाला मारला डोळा?

केस कापून विद्रुप करणाऱ्या शिक्षिकेला निलंबित केलं असलं तरी कोवळ्या आर्यनच्या मनावर झालेला आघात पुसायला वेळ लागणार आहे. मात्र या प्रकरणाने सर्वच मारकुट्या आणि शिस्तीचा अवास्तव बडगा उगारणाऱ्या शिक्षकांना धडा मिळेल ही आशा करायला हरकत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 20, 2018 08:09 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close