मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुणे परिसरातील मोठ्या दुकानाला दणका, लॉकडाउनचे नियम मोडणं पडलं महागात

पुणे परिसरातील मोठ्या दुकानाला दणका, लॉकडाउनचे नियम मोडणं पडलं महागात

मोठ्या दुकानाला खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अतिक्रमण पथकाच्या वतीने सील करण्यात आले आहे.

मोठ्या दुकानाला खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अतिक्रमण पथकाच्या वतीने सील करण्यात आले आहे.

मोठ्या दुकानाला खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अतिक्रमण पथकाच्या वतीने सील करण्यात आले आहे.

    पुणे, 26 जून : लॉकडाऊन काळामध्ये खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाने ठरवून दिलेल्या वेळेतच खडकी परिसरातील सम विषम तारखेप्रमाणे दुकाने उघडण्याचे आदेश असताना सर्रासपणे रोजच दुकान उघडी करून विक्री करणाऱ्या एका मोठ्या दुकानाला खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अतिक्रमण पथकाच्या वतीने सील करण्यात आले आहे.

    खडकी बाजार परिसरातील श्रीराम मंगल कार्यालय जवळ खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे व्यापारी संकुल आहे. यामध्ये होलसेल किराणा भुसार मालाची दुकाने आहेत. यापैकी राजेश ट्रेडिंग या दुकानाला बंद काळात बेकायदेशीर दुकान उघडून व्यवसाय करत असताना खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे आरोग्य निरीक्षक कलावंत पवार हे अतिक्रमण पथकासह कर्तवय बजावत असताना त्यांना हे दुकान उघडे दिसले.

    त्यावेळी पवार यांनी दुकानाला टाळे लावून नंतर सील केले. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत एक दिवस एका बाजूची तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या बाजूची सम विषम तारखेप्रमाणे दुकान सुरू करण्यास बोर्डाने परवानगी दिली असतानाही खडकीत काही ठिकाणी सर्रासपणे दोन्ही बाजूची दुकाने अनेक वेळा उघडी पाहायला मिळतात.

    हेही वाचा - जुलै-ऑगस्टमध्ये होणार कोरोना साथीचा विस्फोट? राज्यात युद्धपातळीवर सज्जतेच्या सूचना

    सराफ बाजारात तर रोजच एका बाजूची दुकाने अर्धवट शटर उघडे करून सुरू असतात. तरीही बोर्डाचे अधिकारी जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष करीत असतात. जर का कोणाची तक्रार आली की फक्त त्याच दुकानावर कारवाई केली जाते, अशी तक्रार खडकीतील काही नागरिक करत आहेत.

    संपादन - अक्षय शितोळे

    First published:

    Tags: Lockdown, Pune news