बापरे! पुण्यात लसीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या सिरिंजच निघाल्या बोगस

बापरे! पुण्यात लसीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या सिरिंजच निघाल्या बोगस

राज्य सरकारकडून पुरवण्यात येणारे इंजेक्शन्स निकृष्ट दर्जाचे असणे हा तर गंभीर मुद्दा आहेच त्याची चौकशी होणं गरजेचं आहे.

  • Share this:

पुणे, 17 मे: पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) लसीकरण (Vaccination) मोहिमेमध्ये लसीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या सिरिंज (Vaccination Syringes) सदोष असल्याच्या अनेक तक्रारी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे आल्या आहेत. या सिरिंज लसीकरण करताना पूर्ण लस शरीरात सोडत नाहीत त्यामुळे लस वाया जाते. या सिरिंजचा दर्जा खराब असल्यामुळे लसीकरणाच्या दरम्यान इंजेक्शनचे पिस्टन तुटतात त्यामुळे या इंजेक्शनचा वापर व्यवस्थित होत नाही आणि परिणामी लस वाया जाते. यासंदर्भात महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी थेट आयुक्तांकडे याप्रकरणी तक्रार केली होती. आरोग्य विभागाकडे लसीकरण केंद्रावरून आलेल्या या तक्रारीनुसार थेट राज्य सरकारला पत्र लिहून सिरींज बदलून देण्याची मागणी महापालिकेकडून करण्यात आली आहे त्यासाठी थेट आरोग्य उपसंचालकांना लसीकरण अधिकाऱ्यांनी पत्र लिहिल आहे.

राज्य सरकारकडून पुरवण्यात येणारे इंजेक्शन्स निकृष्ट दर्जाचे असणे हा तर गंभीर मुद्दा आहेच त्याची चौकशी होणं गरजेचं आहे. मात्र सुमारे चार हजार कोटी रुपयांचे बजेट असलेली पुणे महापालिका तीनशे कोटी रूपये लस खरेदीसाठी तयारी करते आणि दुसरीकडे सुमारे चाळीस लाख लोकसंख्या पुरतील इतक्या इंजेक्शनची दोन कोटी रुपयांची तयारी न करता त्याच्या तक्रारी राज्य सरकारकडे करते हे पाहून सत्ताधाऱ्यांची कीव येत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

वाचा: Pune Corona Update रुग्णसंख्या तीन आकडी, धन्यवाद पुणेकर! महापौरांनी व्यक्त केला आनंद

त्यामुळे हा पत्रव्यवहार तातडीने थांबून लगेच आयुक्तांना असलेल्या विशेष अधिकारात या इंजेक्शनची खरेदी करावी आणि लसीकरण सुरळीत सुरू ठेवावं अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते विशाल तांबे यांनी केली आहे. सत्ताधाऱ्यांनी मात्र या प्रकरणाची माहिती घेऊ आणि गरज पडली तर चौकशी करू अशी सावध भूमिका घेतली आहे.

आधीच शहरात लसीकरणाचा पुरता बोजवाारा उडाला आहे. लसीकरणासाठीच्या अपॉइंटमेंट बूक करता-करता नागरिक हैराण होत आहेत. इंजेक्शनच्या या तक्रारीनंतर आता लस घेतलेल्यांना हसावं की रडावं हेच कळेना झालंय. कारण ज्या तक्रारी करण्यात आल्या आहेत त्यावरून लसीची योग्य मात्रा आपल्या शरीरात गेली आहे का? असा प्रश्न नागरिकांना पडला नाही तर नवल.

Published by: sachin Salve
First published: May 17, 2021, 7:46 PM IST

ताज्या बातम्या