Home /News /pune /

Pune: स्वर्णवला भेटण्यापूर्वीच काळानं गाठलं, भाच्याला भेटण्यासाठी निघालेल्या आत्याचा अपघाती मृत्यू

Pune: स्वर्णवला भेटण्यापूर्वीच काळानं गाठलं, भाच्याला भेटण्यासाठी निघालेल्या आत्याचा अपघाती मृत्यू

Pune Swarnav Chavan: पुण्यातील स्वर्णव चव्हाण या चिमुकल्याला भेटण्यासाठी येत असलेल्या त्याच्या आत्याच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात स्वर्णव चव्हाण याच्या आत्याचा मृत्यू झाला आहे.

पुणे, 20 जानेवारी : पुण्यातील बाणेर येथील अपहरण झालेल्या स्वर्णव चव्हाण (Swarnav Chavan) सुखरूप घरी पोचल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. स्वर्णव सुखरूप घरी परत्याचे कळताच त्याची आत्याही त्याला भेटण्यासाठी पुण्याला (Pune) निघाली मात्र, स्वर्णवला भेटण्यापूर्वीच काळाने घाला घातला. रात्रीच नांदेड (Nanded)वरून भाच्याला भेटण्यासाठी निघालेल्या आत्याच्या गाडीला अपघात (Accident) झाला. या अपघातात स्वर्णवच्या आत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुनिता संतोष राठोड चव्हाण (वय 36 वर्षे) यांच्या गाडीला नगर महामार्गावर अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे. तर सुनिता राठोड यांची दोन मुले आणि त्यांचे पती हे अपघातात जखमी झाले आहेत. समर राठोड (वय 14 वर्षे) अमन राठोड (वय 6 वर्षे) अपघातामध्ये गंभीर जखमी झाले असून सुनिता राठोड पती संतोष राठोड यांना किरकोळ दुखापत झाली आहे. दोन्ही लहान मुलांना उपचारासाठी पुण्यात बाणेर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावरती अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. कालच स्वर्णव चव्हाण सापडल्याचा आनंद सर्व कुटुंबीय आणि बाणेर परिसरात साजरा केला जात होता. पण आता स्वर्णवच्या आत्याचा अपघाती मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे बाणेर परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. 9 दिवसांनी अपहरणनाट्य संपलं 11 जानेवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास पुण्यातील बालेवाडी हायस्ट्रीट जवळील पाठशाळा परिसरातून एका चार वर्षीय अल्पवयीन मुलाचं अज्ञातानं अपहरण केलं होतं. अपहरणकर्त्याने गोड बोलून संबंधित चिमुकल्याला दुचाकीवर बसवून घेऊन गेले होते. संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. चिमुकल्याचं अपहरण झाल्यानंतर त्याच्या आई-वडिलांची अवस्था बेहाल झाली होती. अपहरण झाल्यानंतर अखेर 9 दिवसांनी संबंधित चिमुकला सापडला आहे. ...आणि अपहरणकर्ता स्वर्णवला सोडून पळाला 9 दिवसानंतर पिंपरी चिंचवड शहरातील पुनावळे भागात स्वर्णव सापडला आहे. डॉक्टर दाम्पत्याच्या या मुलाला पोलिसांनी शोधून काढलं आहे. घटनेचा बोभाटा झाल्यानंतर घाबरलेल्या अपहरणकर्त्यांनी स्वत:च त्याची सुटका करून पळ काढला असावा, असा संशय पोलिसांना आहे. स्वर्णवचं अपहरण कुणी केलं? आणि 9 दिवस तो कुठे होता? याबाबत अद्याप कोणतीही माहिती पोलिसांना मिळाली नाही. अशी झाली भेट दोन दिवसांपूर्वी स्वर्णव पिंपरी चिंचवड शहरातील निगडी परिसरात एका व्यक्तीच्या गाडीवर फिरताना दिसला होता. तेव्हापासून पिंपरी चिंचवड पोलिसांनी तब्बल 22 पथक नेमून सगळीकडे नाकाबंदी केली होती. संशयित आरोपीला शोधण्यासाठी शहरातील सर्व cctv ची पाहणी करण्यात येत होती. नाकाबंदीमुळे पोलिसांची यंत्रणा आपल्यापर्यंत पोहोचणार, या भितीतून अपहरणकर्त्याने बुधवारी (19 जानेवारी) दुपारी 1 च्या सुमारास पुनवळेतील लोटस हॉस्पिटलजवळील एका सोसायटीच्या गेटवरील एका वृद्ध वॉचमनकडे स्वर्णवला सोडलं.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Accident, Pune

पुढील बातम्या