मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

तुमची कहाणी सांगा आणि मिळवा बक्षीस, मनातलं शेअर करण्यासाठी पुणेकर विद्यार्थ्याचा उपक्रम

तुमची कहाणी सांगा आणि मिळवा बक्षीस, मनातलं शेअर करण्यासाठी पुणेकर विद्यार्थ्याचा उपक्रम

बोलायला कुणी नाही म्हणून अनेकदा काही व्यक्ती नैराश्याच्या (Depression) गर्तेत जाते आणि अनेकदा आपल्या जीवाचे बरेवाईट करण्याच्या निर्णयापर्यंत देखील पोहोचते. अशावेळी त्यांना बोलण्यासाठी कुणीतरी हवं म्हणून पुण्यातील एका तरुणाने खास मोहीम सुरू केली आहे.

बोलायला कुणी नाही म्हणून अनेकदा काही व्यक्ती नैराश्याच्या (Depression) गर्तेत जाते आणि अनेकदा आपल्या जीवाचे बरेवाईट करण्याच्या निर्णयापर्यंत देखील पोहोचते. अशावेळी त्यांना बोलण्यासाठी कुणीतरी हवं म्हणून पुण्यातील एका तरुणाने खास मोहीम सुरू केली आहे.

बोलायला कुणी नाही म्हणून अनेकदा काही व्यक्ती नैराश्याच्या (Depression) गर्तेत जाते आणि अनेकदा आपल्या जीवाचे बरेवाईट करण्याच्या निर्णयापर्यंत देखील पोहोचते. अशावेळी त्यांना बोलण्यासाठी कुणीतरी हवं म्हणून पुण्यातील एका तरुणाने खास मोहीम सुरू केली आहे.

पुढे वाचा ...
    पुणे, 16 डिसेंबर: आजच्या या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला काहीनाकाही टेन्शन असतं. परंतु आपले मन मोकळे करण्यासाठी अनेकदा हक्काचा माणूस नसतो. त्यामुळे व्यक्ती नैराश्याच्या (Depression) गर्तेत जाते आणि अनेकदा आपल्या जीवाचे बरेवाईट करण्याच्या निर्णयापर्यंत देखील पोहोचते. अशावेळी त्यांना बोलण्यासाठी कुणीतरी हवं म्हणून पुण्यातील एका तरुणाने खास मोहीम सुरू केली आहे. मॅकेनिकल इंजिनिअरिंगचे (mechanical engineer) शिक्षण घेत असलेल्या पुणेकर राज डगवार (Raj dagwar) या विद्यार्थ्याने हे सामाजिक कार्य हाती घेतले आहे. फर्ग्युसन कॉलेजसमोरील रस्त्यावर तो हातामध्ये बोर्ड धरून उभा राहतो. या बोर्डवर असं लिहिलं आहे की, तुमची कथा मला सांगा आणि 10 रुपये मिळवा. त्याच्या या कृतीचं अनेकांनी कौतुक केलं आहे. पुण्यातीलच असणाऱ्या आदित्य या तरुणाने देखील राजबाबत सोशल मीडियावर कौतुकाची थाप देणारी पोस्ट शेअर केली आहे, जी खूप व्हायरल होत आहे.  या कठीण परिस्थितीत प्रत्येकाला मानसिक ताण असतो. परंतु अनेकजण याला मानसिक आजार समजत असल्याने आपली भीती कुणाकडेही व्यक्त करायला घाबरतात. परंतु राज या गोष्टींमधून या नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असून त्याच्या या कामातून लोकांची मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. (हे वाचा-SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 2 दिवस बंद राहणार काही सेवा, हे आहे कारण) न्यूज 18शी बोलताना राज म्हणाला, ‘मी 6 डिसेंबरपासून हा उपक्रम सुरु केला असून दररोज संध्याकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत मी फर्ग्युसन कॉलेजसमोरील रोडवर थांबतो. या कठीण काळात नागरिकांना मानसिक आधार देण्यासाठी मी हा उपक्रम सुरु केला आहे.' दररोज संध्याकाळी 5 तास फुटपाथवर घालवून लोकांच्या कथा ऐकत त्यांना मानसिक आधार देण्याचं काम तो करतो. आतापर्यंत माझ्याबरोबर 100 हुन अधिक जणांनी आपलं मन मोकळं केलं असून आजूबाजूला निरीक्षण केलं असता नागरिक एकमेकांशी बोलत नसल्याचे दिसून येत असल्याचे देखील राज यावेळी म्हणाला. दिवसाला साधारणपणे तो 50 नागरिकांच्या कथा ऐकून घेतो. काहीजण तासंतास त्याच्याबरोबर आपल्या मनातील गोष्टीं सांगत बसतात. महत्त्वाचं म्हणजे ज्या नागरिकांनी त्याच्याकडे आपले मन मोकळं केले आहे त्या सगळ्यांची नावं राजने लक्षात ठेवली आहेत. Good Listener असल्याने अनेकजण त्याच्याकडे मन मोकळं करत असल्याचं राज सांगतो. (हे वाचा-या व्यवसायात आहे दमदार फायदा, तुम्हाला मिळेल 9 लाखांपर्यंत उत्पन्न) कोरोनाच्या (corona 19) या संकटकाळात अनेकजणांना एकटं राहायला लागलं होते. त्यामुळे या अवघड काळात त्यांचं ऐकून घेणारं कुणी नव्हते. अनेकदा व्यक्ती नैराश्याच्या गर्तेत जातो. प्रत्येकाला छोट्या मोठ्या अडचणी असतात. त्यामुळे त्यांचं मन मोकळं करून मी  समजून घेत असल्याचे राज यावेळी म्हणाला. फुटपाथवर उभे राहून अशी काहीतरी कृती करणं सोपं नसल्याचही राज म्हणाला. कारण अनेकजण तुमच्याकडे बघत राहतात, नेमकं मी काय करतो आहे हे जाणून घेण्याची त्यांची इच्छा असते, असं तो म्हणाला. अनेकजण यावर टीका करतात परंतु मी माझ्या परीने प्रयत्न करून लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं देखील राज याने सांगितले. 2019 मध्ये राजही नैराश्याचा शिकार झाला होता. दुबईमध्ये (Dubai) इलेक्ट्रिकल इंजिनिअर असणाऱ्या आपल्या वडिलांसारखे आपण बनू शकणार की नाही याची त्याला भीती वाटत असे. यामुळे त्याने काहीकाळ त्याने डिप्रेशनचा सामना केला. परंतु तो डॉक्टर आणि मानसिक तज्ज्ञांचा सल्ला घेत या संकटातून बाहेर पडला. ज्याला समाजासाठी काही करण्याची इच्छा आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Pune, Pune (City/Town/Village), Pune news

    पुढील बातम्या