Home /News /pune /

पुण्यात लागलेल्या 'पाकिस्तान'च्या होर्डिंगमुळे खळबळ, मुलीचा फोटो शेअर करत लिहिलं....

पुण्यात लागलेल्या 'पाकिस्तान'च्या होर्डिंगमुळे खळबळ, मुलीचा फोटो शेअर करत लिहिलं....

पुण्यातील एसपी महाविद्यालयाच्या चौकात हे होर्डिंग लावण्यात आलं आहे. निखिल पवार यांनी हे होर्डिंग ट्विट केलं. त्यानंतर आता होर्डिंगची जोरदार चर्चा रंगली आहे.

    पुणे, 02 मार्च : CAA-NRC विरोधात ऑल इंडिया मजलिस-ए- इत्तेहादुल मुसलमीन अर्थात AIMIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या सभेत झालेल्या घोषणाबाजीची पुण्यात आठवण करून देण्यात आली आहे. अमुल्या नावाच्या एका तरुणी थेट व्यासपीठावरून 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या होत्या. त्यावर तिचा घोषणा देतानाच्या फोटोसह ‘जिसको चाहिए पाकिस्तान, उसको भेजो कब्रस्तान’ असा मजकूर असलेलं होर्डिंग पुण्यात लावण्यात आलं आहे. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणाऱ्या देणाऱ्या अमूल्याला पोलिसांनी अटकही केली होती. पोलिसांनी तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. अटकेनंतर तिला कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. पण याची आठवण करून देत पुण्याच्या एसपी महाविद्यालयाच्या चौकात मुलीच्या फोटोसह होर्डिंग लावण्यात आलं आहे. अमूल्याचा घोषणा देतानाच्या फोटोसह त्यावर 'जिसको चाहिए पाकिस्तान, उसको भेजो कब्रस्तान' असं लिहिलेलं आहे. पुण्यातील एसपी महाविद्यालयाच्या चौकात हे होर्डिंग लावण्यात आलं आहे. निखिल पवार यांनी हे होर्डिंग ट्विट केलं. त्यानंतर आता होर्डिंगची जोरदार चर्चा रंगली आहे. बंगळुरूमध्ये असदुद्दीन ओवेसी यांच्याकडून CAA-NRC विरोधात एक रॅली काढण्यात आली होती. त्यावेळी सभेच्या ठिकाणी चांगलाच गोंधळ उडाला होता. सभेत असदुद्दीन ओवेसी भाषण करण्यासाठी उभे राहिले असता अमूल्या हिने माईक हातात घेऊन 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या. तिला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र, तिनं तिचं बोलणं सुरूच ठेवलं होतं. तरुणीनं व्यासपीठावर येत तुम्हाला 'पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद फरक सांगते', असं सांगत 'पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद' अशा घोषणा दिल्या होत्या. पतीने नवी साडी घेतली नाही म्हणून महिलेने 6 महिन्यांच्या पोटच्या मुलीचा घेतला जीव ती घोषणा देत असताना खुद्द ओवेसींनी धावत जाऊन तिला रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी तिला थांबवलं आणि तिच्या हातातून माईक हिसकावून नंतर तिला व्यासपीठावरून खाली उतरवण्यात आलं. संबंधित तरुणी सेव्ह कॉन्स्टिट्यूशन नामक संस्थेतर्फे व्यासपीठावर बोलण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. पिस्तुल नकली आहे की असली? असं विचारताच मित्राने झाडल्या गोळ्या
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Pune (City/Town/Village)

    पुढील बातम्या