पुणे, 24 जानेवारी : पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघाताचं थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. लोणी स्टेशनजवळच्या कॉर्नरवर दोन बाईकची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये बाईकवर असलेले दोघेही जखमी झाले आहे. सीसीटीव्ही कॅमेरामध्ये अपघाताची ही घटना कैद झाली आहे.
एमआयटी कॉर्नरवर रस्ता ओलांडताना समोरून येणाऱ्या दुसऱ्या बाईकने जोरदार धडक दिल्यामुळे बाईकवरचे दोन्ही युवक रस्त्यावर पडले. हा अपघात होत असतानाच मागून वेगाने बस येत होती, पण बस चालकाने प्रसंगावधान दाखवत ब्रेक दाबला, ज्यामुळे मोठा अपघात टळला आहे.
पुणे-सोलापूर हायवेवर झालेल्या या अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे, तर दुसऱ्याला किरकोळ दुखापत झाली आहे. जखमी बाईक चालकाला तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, दोन बाईकची समोरासमोर धडक, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद pic.twitter.com/Nze0Hyuzx3
— News18Lokmat (@News18lokmat) January 24, 2023
अपघात झाल्यानंतर लगेचच घटनास्थळी नागरिक पोहोचले आणि त्यांनी दोन्ही बाईकचालकांना बाजूला केल्याचं या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. अपघातानंतर दोन्ही बाईक चालकांना बाजूला घेतल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये नेण्यात आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.