Home /News /pune /

पुण्यातील सिंहगड कॉलेजच्या निखिलचा हायटेक Fraud; पोलीस आयुक्तदेखील झाले हैराण!

पुण्यातील सिंहगड कॉलेजच्या निखिलचा हायटेक Fraud; पोलीस आयुक्तदेखील झाले हैराण!

बीटेकच्या तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी ज्वेलरी खरेदी करायचा, ऑनलाइन पेमेंट करून त्यांना पैसे ट्रान्सफर झाल्याचा स्क्रिनशॉटही दाखवायचा; मात्र खरी गोम इथच होती.

  पुणे, 11 डिसेंबर : महाराष्ट्रातील पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) पोलिसांनी एका अशा हायटेक चोराला अटक केली, जो अॅपच्या माध्यमातून ज्वेलरी शॉपच्या मालकांची फसवणूक करीत होता. फसवणूक करण्याची त्याची पद्धतदेखील वेगळी होती. तो ज्वेलरी खरेदी केल्यानंतर ऑनलाइन (online fraud) पेमेंट (Crime News) करीत होता. फोन डिस्प्लेवर पैसे ट्रान्सफर झाल्याचंदेखील दिसायचं, मात्र पैसे दुकानाच्या मालकाच्या खात्यात जमा होत नव्हते. कोणालाही संशय येऊ नये म्हणून हा पठ्ठ्या त्यांच्यासोबत स्क्रीनशॉटदेखील शेअर करीत होता. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शुक्रवारी सांगितलं की, हैराण करणारा हा गुन्हा 22 वर्षीय तरुण निखिल जैन याने केला आहे. तो औरंगाबाद येथील लासूर भागातील राहणारा आहे. निखिल पुण्यातील सिंहगड कॉलेजमध्ये (Sinhagad College in Pune) बीटेकच्या तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे. तो पुण्यात एका भाड्याच्या घरात राहतो.

  कसं करायचा फसवणूक? - आरोपी सर्वसाधारणपणे ज्या ज्वेलरी शॉपमध्ये जास्त गर्दी आहे, अशा दुकानांना टार्गेट करीत होता. - ज्वेलरी खरेदी केल्यानंतर तो यूपीआयच्या माध्यमातून पेमेंट करणार असल्याचं सांगत असे. - पेमेंट करण्यासाठी तो एक ई-कॉमर्स वेबसाइटच्या यूपीआय पेमेंट सिस्टमचा वापर करीत होता. - बार कोड स्कॅन केल्यानंतर तो रक्कम भरायचा आणि पिन टाकल्यानंतर सक्सेसफुल ट्रान्जॅक्शचा मेसेज दाखवून तेथून निघून जात होता. - दुकानाचा मालक त्याच्या मागे लागू नये म्हणून तो ट्रान्जॅक्शन म्हणजे 20 ते 30 हजारांची खरेदी करीत होता. हे ही वाचा-पुण्यात थेट म्हाडालाच गंडवलं; देशपांडे आणि गोयल यांच्या विरोधात गुन्हा दाखल

  'यू-ट्यूब'वर पाहून घेतली आयडिया पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितलं की, निखिल अभ्यासात हुशार आहे. मात्र तो आपल्या क्रेडिट कार्डचा गरजेपेक्षा जास्त वापर करीत होता. ज्यामुळे त्याच्यावर खूप कर्ज झालं होतं. ते फेडण्यासाठी त्यांनी फेक पेमेंट अॅपचा वापर केला होता. या अॅपबद्दल त्याला यूट्यूबवर माहिती मिळाली होती. दैनिक भास्करने यासंदर्भातील एक वृत्त प्रसिद्ध केलं आहे. पुढे आयुक्तांनी सांगितलं की, या अॅपच्या माध्यमातून खोटं ट्रान्जॅक्शन केलं जातं. म्हणजे पाहताना असं वाटतं की, पैसे ट्रान्सफर झाले, मात्र ते समोरच्या व्यक्तीच्या अकाऊंटमध्ये जात नाही. आरोपी निखिलने देखील या पद्धतीचा वापर केला आणि अनेक ज्वेलरी मालकांकडून लाखोंचे दागिने खरेदी केले. अशी झाली अटक... एका ज्वेलरी शॉपच्या मालकाने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केला आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेतलं. पोलिसांनी निखिडची कडक चौकशी केली, शेवटी त्याने आपला गुन्हा कबुल केला.

  पाच लाखांचा माल केला जप्त... आरोपीजवळ 105 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह महागडा मोबाइल फोन आणि 1 स्कूटर सापडली आहे. याशिवाय आरोपीकडे पाच लाख रुपयांचे महागडे सामान देखील सापडले आहेत. या सर्व वस्तू प्रॉक्सी पेमेंट अॅपच्या माध्यमातून खरेदी करण्यात आल्या होत्या.

  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Crime news, Online fraud, Pune, Upi

  पुढील बातम्या