मराठी बातम्या /बातम्या /पुणे /अशा हस्तकलेच्या वस्तू कधी पाहिल्या नसतील, उत्तर प्रदेशचं आहे कनेक्शन, पुण्यात कुठे? VIDEO

अशा हस्तकलेच्या वस्तू कधी पाहिल्या नसतील, उत्तर प्रदेशचं आहे कनेक्शन, पुण्यात कुठे? VIDEO

X
प्रत्येक

प्रत्येक राज्यामध्ये संस्कृतीनुसार हस्तकलेमध्ये वैविध्य पाहायला मिळते. अशीच खास शैली असलेल्या उत्तरप्रदेशच्या हस्तकलेच्या वस्तू आता पुणेकरांना खरेदी करता येणार आहेत.

प्रत्येक राज्यामध्ये संस्कृतीनुसार हस्तकलेमध्ये वैविध्य पाहायला मिळते. अशीच खास शैली असलेल्या उत्तरप्रदेशच्या हस्तकलेच्या वस्तू आता पुणेकरांना खरेदी करता येणार आहेत.

प्रियांका माळी, प्रतिनिधी

पुणे, 22 मे : कुणी कितीही काहीही म्हटलं तरी रेडिमेड वस्तूंपेक्षा हस्तकलेच्या बनवलेल्या वस्तूंचे सौंदर्य काही वेगळंच असतं. त्यांचा मजबूत आणि टिकाऊपणा त्यांना खऱ्या अर्थाने परिपूर्ण बनवतो. आजकाल रेडीमेडपेक्षा या हॅन्डक्राफ्टेड वस्तूंना अधिक पसंती मिळत आहे. प्रत्येक राज्यामध्ये संस्कृतीनुसार हस्तकलेमध्ये वैविध्य पाहायला मिळते. अशीच खास शैली असलेल्या उत्तर प्रदेशच्या हस्तकलेच्या वस्तू आता पुणेकरांना खरेदी करता येणार आहेत.

कुठे मिळतील वस्तू?

पुण्यातील सोनल हॉलमध्ये भरलेल्या प्रदर्शनात या वस्तूंचा अनोखा नजराणा सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. अनोखी सुंदर ठेवणं असलेल्या या वस्तूंचे त्यांचे वेगळेपण आहे. पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करण्यासाठी या वस्तू म्हणजे बेस्ट पर्याय आहेत. इथे उपलब्ध असलेली प्रत्येक वस्तू आपापल्या वेगळेपणाने संपन्न आणि भुरळ घालणारी आहे.

कोणकोणत्या प्रकारच्या वस्तू आहेत?

या हस्तकलेच्या वस्तूंमध्ये आपल्याला किचनशी संबंधित साधनांपासून ते दैनंदिन वापरातील वस्तूंपर्यंत अनेक प्रकार पाहायला मिळतात. पोळपाट-लाटणे, ट्रे, टी-कोस्टर, बुक स्टँड, अगरबत्ती स्टँड, विविध सजावटीशी संबंधित नमुने, सुशोभित वस्तू, फुलदाणी आणि अशा बऱ्याच वस्तू यांमध्ये उपलब्ध आहेत. यातले अनोखे फ्रुट बास्केट आणि ड्रायफ्रुट बास्केट आपल्या मनात घर करून जाते. त्यांचे वैशिष्ट्य असे की ते एका विशिष्ट पद्धतीमध्ये फोल्ड केले जाते. या वस्तूंची किंमत 50 रुपयांपासून 3 हजार रुपयांपर्यंत आहे.

झणझणीत, चुलीवरची आता विसरा, ही आहे आफ्रिकन मिसळ, कुठे मिळते? पाहा हा VIDEO

5 ते 6 महिन्यांची बनवण्यासाठी प्रदीर्घ प्रोसेस

या वस्तू उत्तरप्रदेश येथे आढळणाऱ्या सिसम या लाकडापासून बनवल्या जातात. अतिशय उत्तम प्रतीच्या या लाकडांची खासियत म्हणजे त्यांना दीर्घकाळापर्यंत बुरशी किंवा कीड लागण्याचा धोका नसतो. या वस्तू बनविण्यामागची पद्धतसुद्धा इंटरेस्टिंग आहे. सिसमचे लाकूड सर्वप्रथम पाण्यात भिजवले जाते आणि मग तब्ब्ल 5 ते 6 महिने या प्रदीर्घ कालावधीनंतर या वस्तूंची निर्मिती होते. त्यामुळे या वस्तू कधीही खराब होत नाहीत आणि तुटत नाहीत. या टिकाऊपणाच्या वैशिष्ट्यामुळे यामधली भांडी अतिशय उपयुक्त ठरतात. आणखी एक विशेष बाब म्हणजे सिसम हे लाकूड फक्त उत्तरप्रदेश या राज्यात आढळते. यांपासून सोफासेट, डायनिंग सेट अशा मोठ्या आकाराची साधनेसुद्धा बनवली जातात, असं विक्रेत्यांनी सांगितले.

First published:
top videos

    Tags: Local18, Pune