Home /News /pune /

'अब चंपाकली मुरझायी हैं!', संजय राऊत यांचा चंद्रकांत पाटील यांना टोला

'अब चंपाकली मुरझायी हैं!', संजय राऊत यांचा चंद्रकांत पाटील यांना टोला

शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांना टोला लगावला आहे.

    पुणे, 06 मे: शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांना टोला लगावला आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांची पुण्यात सभा पार पडली. या सभेत संजय राऊतांनी त्यांना शिवसेना (Shiv Sena) स्टाईलनं तुफान फटकेबाजी केली. यावेळी कोल्हापूरच्या महाविकास आघाडीच्या विजयावर बोलताना त्यांनी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर निशाणा साधला आहे. अब चंपाकली मुरझायी हैं,कोल्हापुरातही (Kolhapur)पराभव झाला, त्यांना तिथेही जागा नाही, असा टोला संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांची पुण्यातील हडपसर येथे सभा पार पडली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार करत असलेली कामे, हिंदुत्व, राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबतची मैत्री, राज ठाकरेंनी भोंग्याविरोधात उठवलेला आवाज, तसंच नुकताच कोल्हापूर उत्तरचा लागलेला निकाल, अशा चौफेर विषयांवर राऊतांनी भाष्य केलं आहे. चंद्रकांत पाटील यांना टोला या सभेत संजय राऊत यांनी कोल्हापूर उत्तरच्या विजयाबद्दल महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं तसंच नेत्यांचं कौतुक केलं. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांना चिमटा काढला. "अब चंपाकली मुरझायी हैं, कोल्हापुरातही पराभव झाला, त्यांना तिथेही जागा नाही", असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. सभेत 'आता पुणे तिथे काय उणे....' असं संजय राऊत म्हणताच बसलेल्या लोकांमधून चंद्रकांत पाटील...चंद्रकांत पाटील असा आवाज आला. त्यावर संजय राऊत म्हणाले की, अब चंपाकली मुरझायी हैं, उनकी बात छोड दो...कोल्हापुरातही त्यांचा पराभव झाला.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: BJP, Chandrakant patil, Sanjay raut, Shivsena

    पुढील बातम्या