Home /News /pune /

Pune: शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल, जीवे मारण्याची धमकी देत गर्भपात केल्याचा तरुणीचा आरोप

Pune: शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल, जीवे मारण्याची धमकी देत गर्भपात केल्याचा तरुणीचा आरोप

Shiv Sena leader Raghunath Kuchik: पुण्यातील शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पुणे, 17 फेब्रुवारी : शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक (Shiv Sena leader Raghunath Kuchik) यांच्यावर पुण्यात बलात्काराचा गुन्हा (Rape case) दाखल करण्यात आला आहे. लग्नाचं आमिष दाखवून 24 वर्षीय तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवले. इतकेच नाही तर ती तरुणी गरोदर झाल्यावर तिचा जबरदस्तीने गर्भपात (abortion) केल्याचाही गंभीर आरोप रघुनाथ कुचिक यांच्यावर करण्यात आला आहे. पीडित तरुणी ही 24 वर्षीय आहे. या तरुणीने रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station Pune) तक्रार दाखल केला आहे. आपल्या तक्रारीत पीडित तरुणीने आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आहे. नोव्हेंबर 2020 ते फेब्रुवारी 2022 या काळात आपल्यासोबत हा सर्व प्रकार घडला असल्याचं तरुणीने तक्रारीत म्हटलं आहे. जीवे मारण्याची धमकी आपल्याला लग्नाचं आमिष दाखवत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. तसेच आपण गरोदर असल्याचं कळल्यानंतर जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने गर्भपात करुन घेतला असा आरोपीही पीडित तरुणीने केला आहे. वाचा : लग्न जुळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल, स्वत:चं सरण रचून शेतकरी तरुणाची आत्महत्या गर्भपात केल्याचं तसेच आपल्या संबंधांबाबत कुणालाही सांगितलं तर तुला जीवे मारेल अशी धमकी देण्यात आल्याचंही पीडित तरुणीने म्हटलं आहे. पीडित तरुणीने या प्रकरणात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुणे पोलीस अधिक तपास करत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून लग्नाचं आमिष दाखवण्यात येत होतं. लग्नाचं आमिष दाखवत आपल्यावर पुणे, गोव्यातील विविध ठिकाणी शारीरिक संबंध ठेवले असंही पीडित तरुणीने म्हटलं आहे. या प्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोलिसांनी आयपीसी 376, 313, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. मात्र, एका ज्येष्ठ नेत्याच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. रघुनाथ कुचिक यांनी दिलं स्पष्टीकरण या संदर्भात रघुनाथ कुचिक यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी म्हटलं, माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याच्या राजकीय कटातून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा ब्लॅकमेलिंगचा एक प्रकार आहे. कामगार क्षेत्रातील माझे काम आणि माझी अनेक वर्षे सामाजिक आणि राजकीय प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न आहे. माझा न्यायव्यवस्था आणि पोलीस खात्यावर पूर्ण विश्वास आहे. तपासानंतर सत्य माझ्या बाजूने येईल असा मला विश्वास आहे. आज गुन्हा दाखल झाला असल्याने मी जास्त बोलणार नाही पण माझी कायदेशीर टीम काम करत असून येत्या दोन दिवसात सविस्तर पुरावे आणि कागदपत्रे देईन असंही रघुनाथ कुचिक यांनी म्हटलं आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Crime, Pune, Shiv sena

    पुढील बातम्या