मराठा आरक्षण: सरकार कोर्टात गेलंय, आणखी 10 जणांना वाटत असेल तर त्यांनी जावं, पवारांनी पुन्हा फटकारले

मराठा आरक्षण: सरकार कोर्टात गेलंय, आणखी 10 जणांना वाटत असेल तर त्यांनी जावं, पवारांनी पुन्हा फटकारले

'यंदा 25 ते 30 टक्के साखर उत्पादन कमी करून इतकं इथेनॉल बनवायचे असा निर्णय घेतला आहे. '

  • Share this:

पुणे 02 ऑक्टोबर: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पार्थ पवार यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याचे संकेत दिले होते. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा पार्थ यांचे नाव न घेतला फटकारले आहे. या प्रश्नावर सरकार कोर्टात गेलं आहे. त्यावरही आणखी कुणी जात असेल तर जावं, दहा जणांनी जावं असं म्हणत त्यांनी फटकारलं आहे. स्थगिती उठावी हीच सरकारची आणि राष्टरवादीची भूमिका असल्याचंही ते म्हणाले.

पवार पुढे म्हणाले, सुप्रीम कोर्टात स्थगिती उठवणे हे गरजेचं आहे. घटना पीठाकडे सुनावणी जावी यासाठी सरकार आग्रही आहे. आत्महत्या करणं योग्य नाही.

साखरेच्या प्रश्नावर आज पुण्यात बैठक झाली होती. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक प्रश्नांवर आपली भूमिका मांडली.

ते म्हणाले, साखरेला जितकी किंमत मिळते तितकीच इथेनॉलमधून मिळेल. वेळही कमी लागतो इथेनॉल निर्मितीला. एकीकडे शेतकऱ्यांना मोकळीक दिली म्हणतात तर दुसरीकडे कांदा निर्यात बंदी केली यात विसंगती आहे.

'पिछे तो देखो...'म्हणणाऱ्या त्या Cute मुलाचा सोनूसाठी खास मेसेज, शेअर केला VIDEO

यंदाच्या वर्षी ऊसाचे उत्पादन वाढणार आहे. गाळप कसं करायचं हा यक्ष प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला उठाव नाही. म्हणून  यंदा 25 ते 30 टक्के साखर उत्पादन कमी करून इतकं इथेनॉल बनवायचे असा निर्णय घेतला आहे. मोदींनीही इथेनॉल बाबत धोरण जाहीर केलं ते परवडणारे आहे. अनुकूल आहे. म्हणून 25 ते 30 टक्के साखर उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आता हे सरकारला कळवू.

दुचाकीवरून जात असताना म्हशीला मारली लाथ आणि...पुढे काय झालं पाहा VIDEO

मुलीच्या अंत्यसंस्काराला नातेवाईकांना उपास्थित राहू दिलं नाही अशी घटना देशात कधी घडली नाही. उत्तर प्रदेश सरकारने कायदा हातात घेतला, टोकाची भूमिका घेतली कायद्याला कवडीची किंमत दिली नाही. राहुल गांधी यांना जाऊ द्यायला पाहिजे होतं भेटू द्यायला पाहिजे होतं.

केंद्र सरकारने नुकतेच जे कृषी विषयक निर्णय घेतले त्याबद्दल आमची नाराजी आहे म्हणून पंजाब हरयाणा येथे लोक रस्त्यावर आले.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 2, 2020, 4:26 PM IST

ताज्या बातम्या