पुणे, 21 जानेवारी: सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India) मध्ये लागलेली आग विझवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती SII चे सीईओ अदार पुनावाला यांनी दिली आहे. या आगीनंतर लोकांनी व्यक्त केलेल्या काळजीसाठी त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.
अदार पुनावाला यांनी असे ट्वीट केले आहे की, 'तुम्ही व्यक्त केलेल्या काळजीसाठी आणि तुमच्या प्रार्थनांसाठी सर्वांचे धन्यवाद. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे काही मजले उद्ध्वस्त झाले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे किंवा गंभीर दुखापत झाली नाही.'
Thank you everyone for your concern and prayers. So far the most important thing is that there have been no lives lost or major injuries due to the fire, despite a few floors being destroyed.
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) January 21, 2021
गेल्या काही महिन्यांपासून सीरमकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. अशावळी लागलेली आग धक्कादायक आहे. त्यामुळे अनेकांनी चिंता व्यक्त केल्यानंतर पुनावाला यांनी अशाप्रकारचे ट्वीट केले आहे.
दरम्यान सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीनंतर प्रशासनाकडून काही महत्त्वाच्या प्रतिक्रिया येत आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या प्लँटमध्ये लागलेल्या आगीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेत पुण्यातील यंत्रणेला आग आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेची विभागीय आयुक्त तसेच मनपा आयुक्तांकडून माहिती घेत आग आटोक्यात आणण्यासाठी आणि आवश्यकता भासल्यास मदत आणि अनुषंगिक आपत्कालीन उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले होते. घटनास्थळी पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख पोहोचले असून ते या घटनेचा आढावा घेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.