मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

Pune School: पहिली ते आठवीचे वर्ग आता पूर्ण वेळ भरणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती

Pune School: पहिली ते आठवीचे वर्ग आता पूर्ण वेळ भरणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती

Pune School news updates: पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Pune School news updates: पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Pune School news updates: पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे, 5 फेब्रुवारी: पुण्यातील कोरोना (Corona cases in Pune) बाधितांची दैनंदिन संख्या आता कमी होत आहे. त्यासोबतच लसीकरण सुद्धा वेगाने होत आहे. त्यामुळे आता पुण्यातील शाळांच्या (Pune School) संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील शाळा-महाविद्यालये 1 फेब्रुवारीपासून सुरू (Pune School colleges reopen) करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पहिली ते आठवीचे वर्ग हे चार तासच भरवले जात होते. पण आता पहिली ते आठवीचे वर्ग हे पूर्ण वेळ भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यातील कोरोनाच्या स्थितीच्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पुण्यातील रुग्णसंख्येत घसरण उपमुख्यमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar) म्हणाले, पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा बैठकीत घेण्यात आला. जागतिक परिस्थिती पाहता नव्या रुग्णसंख्येत घट झाली आहे. पण दैनंदिन कोविड मृतकांच्या संख्येत वाढ झाली आहे. या मागचं नक्की कारण डॉक्टरांकडून शोधण्याचं काम सुरू आहे. फ्रान्स आणि अमेरिकेत नव्या रुग्णसंख्येत घट होतेय, जर्मनीत वाढ होतेय तर आपल्या देशात गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोरोना रुग्णसंख्येत 30 टक्क्यांनी घट झाली आहे. पुण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर, पुणे जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्येत 50 टक्क्यांनी घट झाली आहे. वाचा : SSC HSC exams 2022: परीक्षा केंद्र शाळेतच ते सोशल डिस्टन्सिंगसाठी झिगझॅग पद्धत शाळा पूर्णवेळ भरणार 1 फेब्रुवारीपासून पुण्यातील शाळा सुरू केल्या. पहिली ते आठवीचे वर्ग अर्ध वेळ भरवण्यात येत होत्या. पण आता पहिली ते आठवीचे वर्ग पण पूर्णवेळ भरवण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. त्यामुळे आता पुण्यातील पहिली ते आठवीचे वर्ग पूर्ण वेळ भरवण्यात येणार आहेत. 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीचा तुटवडा पुणे जिल्ह्यात लसीकरण चांगले सुरू आहे. पहिला डोस अनेकांचा झाला आहे. दुसरा डोस पुणे जिल्ह्यात 86 टक्के इतका झाला आहे. पण 15 ते 18 वयोगटात पुणे-पिंपरी चिंचवड शहरात कमी लसीकरण झालं आहे. ग्रामीण भागात चांगले लसीकरण झाले आहे. 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीचा तुटवडा जानवतोय. सोमवारी लसींचा साठा उपलब्ध होईल. मी सुद्धा मुंबईत गेल्यावर संबंदितांसोबत बोलतो. कुठेही लसींचा तुटवडा होता कामा नये. जम्बो हॉस्पिटलचा निर्णय 18 फेब्रुवारीनंतर घेण्यात येईल. वाचा : SSC HSC exams 2022: 10वी आणि 12वीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार, बोर्डाने केलं स्पष्ट टीईटी घोटाळा चौकशीत पोलिसांवर दबाव नाही टीईटी घोटाळा चौकशी प्रकरणी पोलिसांवर कोणताही दबाव नाही, मुख्य सचिव तपासाची माहिती घेऊ शकतात. त्यांना तो अधिकार आहे, पण या टीईटी घोटाळा चौकशीत सरकारच्या बाजुने कोणताही हस्तक्षेप केला जाणार नाही अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Ajit pawar, Corona, Covid-19, Pune, Pune school, School, Vaccination

पुढील बातम्या