पुणे 13 फेब्रुवारी : घराबाहेर खेळत असताना एक दोन वर्षांचा मुलगा नाल्यात पडल्याची घटना घडलीय. पुण्यातल्या सिंहगड परिसरात ही घटना घडली. संस्कार बंडू साबळे असं त्या मुलाचं नावं आहे. गुरुवारी दुपारी ही घटना घडली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने शोधकार्य सुरु केलं. या नाल्यात 8 ते 10 फुट खड्डा असून नाल्यातून पाणी सतत वाहत असतं. संध्याकाळपर्यंत त्याचा शोध सुरु होता. मात्र बचाव पथकाला संस्कार काही सापडला नाही. अंधार पडल्याने बचाव कार्य थांबविण्यात आलं होतं. आज सकाळी पुन्हा बचाव कार्य सुरु झालंय.
साबळे कुटुंबीय हे मराठवाड्यातून पुण्यात आलेलं होतं. सिंहगड परिसरातल्या रक्षालेखा सोसायटीत ते राहात होते त्यांचा संस्कार हा 2 वर्षांचा मुलगा घराबाहेर खेळत होता. खेळत असतानाच तो नाल्याच्या जवळ गेला आणि खड्ड्यात पडला. या नाल्याच्या परिसरात झुडपं आणि राडा रोडा असल्याने अग्निशमन विभागाला अडचणी येत आहेत.
हेही वाचा...
धक्कादायक! पेस्ट कंट्रोलनंतर केलं दुर्लक्ष, पुण्यातील दाम्पत्याचा मृत्यू
डोबिंवलीतील 'त्या' महिलेचा मृत्यू हृदयविकाराने, पोलिसांची माहिती
शिवसेनेनेनं रद्द केलेला शरद पोंक्षे यांचा `अथांग सावरकर' कार्यक्रम भाजप करणार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident in pune