बारामती तालुक्यात तब्बल 46 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त, पोलिसांनी पाठलाग करून आरोपींना पकडलं

बारामती तालुक्यात तब्बल 46 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त, पोलिसांनी पाठलाग करून आरोपींना पकडलं

पुणे जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई आसल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी सांगितलं आहे .

  • Share this:

बारामती, 21 सप्टेंबर : बारामती ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल 46 लाख रूपये किमतीचा 312 किलो गांजा जप्त केला आहे. तसंच यातील चार अरोपींना अटक केली आहे. हा गांजा सातारा, सांगली जिल्ह्यात विक्री करण्यासाठी विशाखापट्टणम येथून आणलेला होता. पुणे जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई आसल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी सांगितलं आहे .

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटस ते भिगवण रोडने मोठ्या प्रमाणात गांजा घेऊन जाण्यात येणार आहे, अशी माहिती बारामती ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर तालुक्यातील उंडवडी येथील ड्रायव्हर ढाबा येथे अशोक लेलंड गाडी क्रमांक MH10 CR 4226 जात आसताना पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालक न थांबता बारामतीच्या दिशेने भरघावपणे निघाला.

पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी या ट्रकचा पाठलाग करून बर्हानपूर फाटा येथे अडवला असता त्याची तपासणी केली. यामध्ये 312 किलो वजनाचा गांजा आढळून आला. तो 46 लाख रूपये किमतीचा असून विशाखापट्टणम आंध्रप्रदेश येथून आणला आसल्याची आरोपींनी कबुली दिली आहे.

हा गांजा सातारा, सांगली या जिल्ह्यात विक्री करण्यासाठी घेऊन जात आसल्याचे पोलिसांनी सांगितले असून यातील चार अरोपींना अटक केली आहे.

सदर कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Published by: Akshay Shitole
First published: September 21, 2020, 11:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading