पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात धुमाकूळ घालणारे 2 अट्टल दरोडेखोर अखेर अटकेत, पोलिसांनी असा रचला सापळा

पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात धुमाकूळ घालणारे 2 अट्टल दरोडेखोर अखेर अटकेत, पोलिसांनी असा रचला सापळा

मागील महिन्यात आळेफाटा पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल झाला होता.

  • Share this:

जुन्नर, 8 जानेवारी : पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या दोन अट्टल दरोडेखोरांना जेरबंद करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं आहे. मागील महिन्यात आळेफाटा पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेता गुन्ह्यातील आरोपींचा त्वरित शोध घेऊन त्यांना अटक करण्याच्या सूचना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

आरोपींची माहिती घेण्यासाठी आळेफाटा, पारनेर, निघोज, साकोरी या भागात शोध सुरू केला असता खबऱ्यामार्फत शिरूर पोलीस स्टेशन गु. र. नं.748/2019 भा.द.वी कलम 395 मधील फरार आरोपी नामे विशाल उर्फ कोंग्या काळे हा टाकळी हाजी परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार निघोज बाजूकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा लावून पोलीस थांबले.

यावेळी दोन इसम निघोजकडे जाताना दिसले, मात्र त्यांना पोलिसांचा संशय आल्याने ते पळून जाऊ लागले. सदर इसमांचा पाठलाग करून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

ताब्यात घेतलेल्या आरोपींनी त्यांचं नाव व पत्ता -1) विशाल उर्फ कोंग्या नरेश काळे वय 26 वर्षे रा. निघोज ता.पारनेर जि. अ.नगर ,2)दिपक उर्फ आशिक आझाद काळे वय 25 वर्षे रा. निघोज ता. पारनेर जि.अ नगर असे असल्याचे सांगितलं. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी मागील चार पाच महिन्यात ओतूर, आळेफाटा, मंचर लोणीकंद, पारनेर या भागात त्यांचे इतर साथीदारांसोबत गुन्हे केल्याचे त्यांनी कबूल केले.

आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित पोलीस स्टेशनकडून माहिती घेतली असता त्यांनी अनेक पोलीस स्टेशन च्या हद्दीत गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले.

1) आळेफाटा पोलीस स्टेशन गु.र.नं.430/2020 भा.द.वी.कलम 395

2) आळेफाटा पोलीस स्टेशन गु.र.नं.426/2020 भा.द.वी.कलम 394,34

3) ओतूर पोलीस स्टेशन गु.र.नं.233/2020 भा.द.वी.कलम 457,380

4) मंचर पोलीस स्टेशन गु.र.नं.688/2020 भा.द.वी.कलम 394,34

5) लोणीकंद पोलीस स्टेशन गु.र.नं.1007/2020 भा.द.वी.कलम 380

6) पारनेर पोलीस स्टेशन गु.र.नं.111/2020 भा.द.वी.कलम 457,380

7 )बेलवंडी पोलीस स्टेशन गु.र.नं.594/2020 भा.द.वी.कलम 394

8 )शिरूर पोलीस स्टेशन गु.र.नं.748/2019 भा.द.वी.कलम 395

दरम्यान, सदरची कार्यवाही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उप. विभा. पो.अधिकारी. मंदार जवळे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट सो. यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. नेताजी गंधारे,सफो.दत्तात्रय गिरमकर,पोहवा.विक्रम तापकीर,पोहवा. काशीनाथ राजापूरे,पोना.दिपक साबळे,पोना. अजित भुजबळ,पोना. मंगेश थीगळे,पोशी.संदीप वारे

पोशी. अक्षय नवले,पोशी. निलेश सुपेकर यांनी केली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: January 8, 2021, 5:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading