Home /News /pune /

प्रामाणिक रिक्षाचालक! 7 लाखांचा ऐवज असलेली बॅग दाम्पत्याला केली परत

प्रामाणिक रिक्षाचालक! 7 लाखांचा ऐवज असलेली बॅग दाम्पत्याला केली परत

2 हजारांच्या नोटींची छपाई बंद करण्याचा कुठलाही विचार नाही. सरकार RBIच्या शिफारशीनुसार त्याबाबत निर्णय घेते असं त्यांनी सांगितलं.

2 हजारांच्या नोटींची छपाई बंद करण्याचा कुठलाही विचार नाही. सरकार RBIच्या शिफारशीनुसार त्याबाबत निर्णय घेते असं त्यांनी सांगितलं.

कोरोनाचे संकट व लॉकडाऊनमुळे ठप्प असलेले व्यवसाय यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

    पुणे, 12 सप्टेंबर : पुण्यातील एका 60 वर्षीय रिक्षाचालकाने प्रवासी विसरलेले व तब्बल सात लाखांचा ऐवज असलेली बॅग दाम्पत्याला परत करून प्रमाणिकतेचे दर्शन घडविले आहे. या गरीब मात्र प्रामाणिक रिक्षाचालकाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कोरोनाचे संकट व लॉकडाऊनमुळे ठप्प असलेले व्यवसाय यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यात सर्वाधिक परिणाम झाला तो रिक्षाचालक या घटकावर रिक्षा सुरू होण्यास वेळ लागला त्या सुरू झाल्या मात्र प्रवासी घटले त्यामुळे व्यवसाय अजूनही पूर्णतः रुळावर नाही. त्यामुळे रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे, मात्र पुण्यातील विठ्ठल मापरे या 60 वर्षीय रिक्षाचालकाने अश्या स्थितीतही प्रामाणिकपणा कायम ठेवला आहे. हे वाचा-4 सेकंदात कोसळलं घर पण थोडक्यात बचावला जीव, पाहा थरारक VIDEO बुधवार हि घटना घडली असून मापरे यांच्या रिक्षात केशवनगर स्टॉप येथून एक दाम्पत्य बसले व हडपसर बस्थांनकावर उतरले, या प्रवासात मात्र त्यांची बॅग रिक्षातच विसरले. मापरे यांनी सांगितले की, मी बीटी कावडे रोड येथे गेलो व चहा घेण्यासाठी रिक्षा पार्क केली, तेव्हा मला जाणवले की रिक्षात मागच्या सीटवर कोणाचीतरी एक बॅग राहिली आहे. मी ती बॅग न उघडता तातडीने जवळ असलेल्या घोरपडी चौकीत गेलो त्या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक विजय कदम होते. दरम्यान कदम यांना मापरे यांनी सर्व घटनाक्रम सांगितला. उपनिरीक्षक कदम यांनी बॅग उघडून बघितली असता त्यात 11 तोळे सोने, 2 लाख रोकड असा 7 लाखांचा ऐवज व काही कपडे होते. घटनाक्रम एकूण कदम यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फोन केला. तेव्हा मेहबूब आणि शैहणाज शेख हे दाम्पत्य त्या ठिकाणी बॅग हरवल्याची तक्रार देण्यासाठीच आल्याची माहिती त्यांना मिळाली. मुंढवा पोलीस स्थानकात या दाम्पत्याला बॅग परत करण्यात आली. हे वाचा-वीज कोसळताना कधी पाहिली का? कल्याणच्या दुर्गाडी चौकातला VIDEO व्हायरल रिक्षाचालक मापरे यांच्या या प्रामाणिकपणाचे पोलीस उपायुक्त सुहास बावचे व उपनिरीक्षक कदम यांनी कौतुक केले. विठ्ठल मापरे हे अनेक वर्षांपासून रिक्षाचालक असून एका छोट्या भाड्याच्या घरात राहतात त्यांचा मुलगा एका खासगी कंपनीत कामाला आहे. या घटनेनंतर लोकांच्या येणाऱ्या प्रतिक्रिया, मिळणारे आशीर्वाद हे आपल्यासाठी मोठे बक्षीस आल्याचे मापरे म्हणाले.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Pune news

    पुढील बातम्या