मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुण्यात निवृत्त पोलीस निरीक्षकाने दारू पिऊन गाडी चालवत 5 जणांना उडवले; एकाचा मृत्यू, 4 जखमी

पुण्यात निवृत्त पोलीस निरीक्षकाने दारू पिऊन गाडी चालवत 5 जणांना उडवले; एकाचा मृत्यू, 4 जखमी

एकाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.

एकाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.

एकाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.

पुणे, 6 सप्टेंबर : पुणे शहरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने दारू पिऊन बेदरकारपणे वाहन चालवत 5 जणांना चिरडलं आहे. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. संजय निकम असं या निवृत्त पोलीस निरीक्षकाचं नाव आहे.

पुण्यातील बाणेर बालेवाडी परिसरातील चतुशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. दारूच्या नशेत असलेल्या संजय निकम याने रस्त्यावरील 5 जणांना उडवलं. तसंच एका टेम्पोलाही धडक दिली. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी निवृत्त पोलीस निरीक्षकाला ताब्यात घेतलं आहे. आरोपी संजय निकम याची वैद्यकीय चाचणी केली असताना त्याने मद्य प्यायलं असल्याचं स्पष्ट झालं.

पोलीस प्रशासनात वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या संजय निकम याने असं कृत्य केल्याने सगळीकडे संतापाची लाट पसरली आहे. आरोपीच्या चुकीमुळे एका निष्पाप व्यक्तीला आपला जीव गमावावा लागला आहे, तर 4 जण मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यामुळे सदर आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

हेही वाचा - पुण्यातील या भागात लॉकडाऊनची घोषणा, मात्र पुन्हा निर्णय घेतला मागे

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईतही असाच एक प्रकार घडला होता. अज्ञात व्यक्तीने भरधाव वेगात कार चालवत मुंबईतील गजबलेल्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये 8 लोकांना चिरडलं होतं. यातील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला होता, तर 4 जण जखमी झाले होते.

First published:

Tags: Pune accident, Pune news