मराठी बातम्या /बातम्या /पुणे /दर 15 मिनिटांनी पुणेकरांना मिळणार पावसाचं LIVE अपडेट; शेतकऱ्यांना होणार दुप्पट फायदा, मोबाइल अ‍ॅप लॉन्च

दर 15 मिनिटांनी पुणेकरांना मिळणार पावसाचं LIVE अपडेट; शेतकऱ्यांना होणार दुप्पट फायदा, मोबाइल अ‍ॅप लॉन्च

आज हवामान खात्यानं राज्यात पाच जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे.

आज हवामान खात्यानं राज्यात पाच जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे.

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाकडून एका मोबाइल अ‍ॅपचं अनावरण करण्यात आलं आहे. मोबाईल अधारित असणारं हे अ‍ॅप पुणेकरांना दर 15 मिनिटांनी पावसाचं लाइव्ह अपडेट देणार आहे.

पुणे, 28 जुलै: केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या 15 व्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना मंत्रालयाकडून एक अनमोल भेट देण्यात आली आहे. मंगळवारी झालेल्या कार्यक्रमांत पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम राजीवन यांच्या हस्ते एका मोबाइल अ‍ॅपचं अनावरण करण्यात आलं आहे. मोबाईल अधारित असणारं हे अ‍ॅप पुणेकरांना दर 15 मिनिटांनी पावसाचं लाइव्ह अपडेट देणार आहे. यामुळे पुढच्या पंधरा मिनिटांत किती आणि कुठे पाऊस पडतो, याची अद्ययावत माहिती मोबाइलवर सहज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हवामान विभागाच्या वेबसाइटवर अवलंबून राहावं लागणार नाही.

या अ‍ॅपचं नाव Pune Weather Live असं असून देशभरातील 80 वेधशाळांची माहिती एकत्रित करून ही अपडेट देण्यात येणार आहे. याचा शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. हे मोबाइल अ‍ॅप पुण्यातील आयएमडीच्या सरफेस इन्स्ट्रुमेंटेशन डीव्हीजन आणि महाराष्ट्र सरकारच्या जलसंपदा विभाग यांनी संयुक्तपणे विकसित केलं आहे. हे अ‍ॅप आपल्या लोकेशनच्या अधारावर आसपासच्या परिसरात हवामानात नेमके काय बदल होतं आहेत, याची माहिती प्रदान करणार आहे. रिअल टाइम माहिती मिळाल्यामुळे याचा फायदा शेतकऱ्यांसोबत अन्य नागरिकांना देखील होणार आहे.

हेही वाचा-पुण्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या घटली; गाठला 9 महिन्यांचा निच्चांक

हवामान मॉडेलबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, “सध्याच्या हवामान मॉडेल्समध्ये 12 किमी पासून 5 किमी पर्यंत रिझॉल्युशन  वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा पद्धतीनं हवामान अंदाज व्यक्त केल्यास शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे. त्यांचं उत्पन्न दुप्पट होऊ शकतं,” असंही केंद्रीय मंत्री म्हणाले.

हेही वाचा-Breaking News: लवकरच महाराष्ट्र राज्यातील लॉकडाऊन उठणार?

यावेळी मंत्र्यांनी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाकडून राबवण्यात येणाऱ्या पुढील पाच वर्षांतील महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल देखील माहिती दिली आहे. संबंधित प्रकल्पांसाठी अलीकडेच तब्बल 4000 कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये डीप ओशियन मिशन, ब्ल्यु इकोनॉमी, हवामानाबाद विविध संशोधन, ध्रुवीय विज्ञान, भूकंपविज्ञान सेवा आणि समुद्र तंत्रज्ञान अशा विविध प्रकल्पांचा समावेश आहे. ब्ल्यु इकोनॉमी हा प्रकल्प शेवटच्या टप्प्यात असल्याची माहिती देखील मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

First published:
top videos

    Tags: Pune, Weather