लसीकरणासाठी पुणेकरांची ग्रामीण भागात धाव; गावकऱ्यांची मात्र परवड

लसीकरणासाठी पुणेकरांची ग्रामीण भागात धाव; गावकऱ्यांची मात्र परवड

मात्र ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी केंद्र सरकारने दिलेली साईड ही दिवसभरातून काही मिनिटांसाठीच ओपन होते व पुन्हा तत्काळ बंद होते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना या साईडवर नोंदणी करणे अवघड जात आहे.

  • Share this:

पुणे, 9 मे : जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या लसीकरणाच्या घोळाचा एक अजब प्रकार मंचर येथील तरुणांनी उघड केला आहे. मंचर उपजिल्हा रुग्णालयात सुरू असलेल्या 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचा लाभ पुणे शहर व परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात घेत आहेत. त्यासाठी या शहरी नागरिकांकडून गैर पद्धतीने ऑनलाईन नोंदणी करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले असून त्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे मंचर शहराध्यक्ष सुहास बाणखेले यांनी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

केंद्र सरकारच्या धोरणानुसार ऑनलाईन नोंदणी करून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्याचे काम मंचर उपजिल्हा रुग्णालयात सुरू आहे. मात्र ऑनलाईन नोंदणी पद्धतीच्या कच्या दुव्यांचा फायदा उठवत लसीकरणासाठी पुणे शहर व परिसरातील नागरिक लस घेण्यासाठी मंचर या ठिकाणी गर्दी करत आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिक लसीकरणापासून वंचित राहत आहेत.

केंद्र शासनाच्या धोरणानुसार 18 ते 45 वयोगटातील व्यक्तींना लस घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागते. मात्र ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी केंद्र सरकारने दिलेली साईड ही दिवसभरातून काही मिनिटांसाठीच ओपन होते व पुन्हा तत्काळ बंद होते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना या साईडवर नोंदणी करणे अवघड जात आहे. त्याउलट दिवसभरात ही साईड केव्हाही ओपन झाल्यानंतर टेलिग्राम या मेसेंजर अॅपच्या माध्यमातून पुणे शहरातील काही ठराविक ग्रुपवर लगेच मॅसेज जातात व त्यामुळे पुणे शहर व परिसरातील नागरिक त्या ओपन झालेल्या साईटवर तत्काळ नोंदणी करतात व ग्रामीण भागात येऊन लस घेऊन जातात. ही बाब मंचर उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणाची माहिती घेण्यासाठी गेलेल्या समीर घेवडे या स्थानिक तरुणांच्या लक्षात आल्यानंतर त्यावर आवाज उठविण्यात आला असून याबाबत मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हे ही वाचा-Coronavirus : राज्यातील आकडे दिलासादायक, मुंबईत रुग्णसंख्या झपाट्याने घटली

लसीकरणाच्या ऑनलाईन नोंदणी पद्धतीत घोळ होत अडल्याचे व त्याचा भुर्दंड ग्रामीण भागातील नागरिकांना बसत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने व राज्य सरकारने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण नोंदणीसाठी ऑनलाईन पद्धती ऐवजी ऑफलाईन पद्धत सुरू करावी अशी मागणी यावेळी सुहास बाणखेले व समीर घेवडे यांनी केली आहे.

पोलीस तपास सुरू

लसीकरणाच्या ऑनलाईन नोंदणी पद्धतीतील गैरप्रकारांबाबत मंचर पोलीस ठाण्यास तक्रार प्राप्त झाली आहे. याबाबत चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. अशी माहिती यावेळी मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी दिली.

Published by: Meenal Gangurde
First published: May 9, 2021, 9:47 PM IST

ताज्या बातम्या