मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुण्यात चिंता वाढवणारा दिवस; गेल्या 24 तासांत 8 मृत्यू!

पुण्यात चिंता वाढवणारा दिवस; गेल्या 24 तासांत 8 मृत्यू!

पुण्यात Coronavirus  चं थैमान सुरूच आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे, तसा मृतांचा आकडाही वाढतो आहे. त्यामुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे.

पुण्यात Coronavirus चं थैमान सुरूच आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे, तसा मृतांचा आकडाही वाढतो आहे. त्यामुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे.

पुण्यात Coronavirus चं थैमान सुरूच आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे, तसा मृतांचा आकडाही वाढतो आहे. त्यामुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे.

  • Published by:  अरुंधती रानडे जोशी
पुणे, 08 एप्रिल : पुण्यात Coronavirus  चं थैमान सुरूच आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे, तसा मृतांचा आकडाही वाढतो आहे. त्यामुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे. पुण्यात दुपारपर्यंत 5 मृत्यूंची नोंद झाली होती. आणखी 3 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याची बातमी आता आली आहे. त्यामुळे दिवसभरात पुण्यात कोरोनाचे 8 बळी गेले. हा आतापर्यंतचा मोठा आणि चिंता वाढवणारा आकडा आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांच्या आकडा कालच हजार पार गेला. त्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. निम्म्याच्या वर संख्या मुंबईतल्या कोरोनाग्रस्तांची आहे. त्यानंतर पुण्यात कोरोनारुग्ण सापडले आहेत. कोरोनामुळे देशभरात आतापर्यंत 149 जणांचा मृत्यू झाले आहेत. ससून रुग्णालयातील 3 जणांचा तर नायडू आणि नोबेलमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यात दुपारनंतर 3 मृत्यूंची भर पडली. एकट्या पुण्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 16 वर पोहोचली आहे. पुणे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात 1135 कोरोना पॉझिटिव्ह देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या 5000 च्या आसपास पोहोचली असताना महाराष्ट्रातील नवी धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. राज्यात सर्वाधिक 1135 रुग्ण आहेत. त्यातले जवळपास 60 जण एका रात्रीत वाढलेली संख्या आहे. महाराष्ट्रातील राज्यपालांवर शरद पवार नाराज? मोदींसोबतच्या चर्चेत मांडला मुद्दा 12 तासांत 60 रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. त्यापैकी मुंबईत 12 तासांत 44, पुण्यात 9, अकोला आणि बुलडाण्यात प्रत्येकी एक रुग्ण तर नागपुरात नवीन 4 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळले आहेत. देशभरात सर्वात जास्त रुग्णांची संख्या असणारं राज्य महाराष्ट्र आहे. पुढचे 7 दिवस महत्त्वाचे पुढचे 7 दिवस संसर्ग वाढण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. या दिवसात काळजी घेतली तर कोरोनाचा फैलाव आवाक्याबाहेर होणार नाही, असं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. मुंबईबरोबरच पुण्यातही मास्क लावून जाणं बंधनकारक करण्यात आलं आहे. पुण्याच्या मध्यवर्ती पेठांचा भाग सील करण्यात आला आहे. दुपारी पोलिसांनी संचलनही केलं. पुणेकरांना बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. FACT CHECK : तबलिगीवरून महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी थेट अमित शहांना प्रश्न?
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या