Home /News /pune /

Pune Corona : पुणेकरांनो काळजी घ्या, दिवसभरात तब्बल 4 हजार 29 नवे कोरोनाबाधित

Pune Corona : पुणेकरांनो काळजी घ्या, दिवसभरात तब्बल 4 हजार 29 नवे कोरोनाबाधित

पुण्यात दिवसभरात तब्बल 4 हजार 29 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये पुण्यातील दोन तर पुण्याबाहेरील एका रुग्णाच्या मृत्यूची नाोंद आहे.

पुणे, 9 जानेवारी : राज्यात कोरोनाचा (Corona) हाहा:कार सुरु आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या (Corona Patients) संख्येत प्रचंड वाढ होताना दिसत आहे. विशेष म्हणजे मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) शहरात सर्वाधित कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होताना दिसत आहे. पुण्यात तर नव्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने गेल्या अनेक महिन्यांपासूनचा रेकॉर्ड मोडला आहे. पुण्यात आज दिवसभरात तब्बल 4 हजार 29 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये पुण्यातील दोन तर पुण्याबाहेरील एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपृर्वी पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक 2 हजार 757 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यानंतर काल (8 जानेवारी) दिवसभरात 2 हजार 471 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला, असं मानलं जात होतं. पण हे संकट हे अद्यापही टळलेलं नाही याची पुन्हा चाहूल लागली आहे. कारण पुण्यात आज दिवसभरात तब्बल 4 हजार 29 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. पुण्यात आज दिवसभरात 688 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तसेच पुणे शहरात दोन कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर पुण्याबाहेरील 1 रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. शहरात सध्या 14 हजार 890 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुण्यात आतापर्यंत एकूण 5 लाख 26 हजार 35 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी  5 लाख 2 हजार 18 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 9 हजार 127 रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. 'परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात', महापौरांची प्रतिक्रिया दरम्यान, पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी पुणेकरांना काळजी न करण्यांचं आवाहन केलं. "पुणे मनपा हद्दीत आज 4 हजार 29 नवे कोरोनाबाधितांची नोंद झाली असली तरी 14 हजार 890 सक्रीय रुग्णांपैकी केवळ 5.48 टक्केच रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. शिवाय आज केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून काळजी करण्याऐवजी काळजी घ्यावी", असं महापौरांनी सांगितलं. पुण्यातील कोरोनाबाधितांची गेल्या आठ दिवसांमधील रुग्णसंख्या 1 जानेवारी 399 2 जानेवारी 526 3 जानेवारी 444 4 जानेवारी 1104 5 जानेवारी 1805 6 जानेवारी 2284 7 जानेवारी 2757 8 जानेवारी 2471 9 जानेवारी 4029 हेही वाचा : महाराष्ट्र सरकारचा अवघ्या बारा तासात यूटर्न, ब्यूटी पार्लर आणि जीमसाठी नवी नियमावली जारी राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी नियमावली जारी राज्यात कोरोनाचा वाढता आकडा लक्षात घेता राज्य सरकारने नवे निर्बंध जाहीर केले आहेत. हे नवे निर्बंध आज रात्री बारा वाजेपासून लागू होण्याची शक्यता आहे. या नव्या नियमावलीनुसार राज्यात दिवसा जमावबंदी तर रात्रीची संचारबंदी लागू होईल. नागरिकांना पर्यटनस्थळी, खुले मैदान, गार्डन, स्विमिंग पूल इथे जाण्यास बंदी राहील. तसेच सलून, ब्यूटी पार्लर फक्त 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. याशिवाय अनेक महत्त्वपूर्ण नियम राज्य सरकारकडून जारी करण्यात आले आहेत. हेही वाचा : पुढील 3 दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता; पुण्यासह या जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा संसदेतही कोरोनाचा शिरकाव देशातील सर्वोच्च सभागृह मानल्या जाणाऱ्या संसदेतही कोरोनाने शिरकाव केला आहे. दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढतेय. त्याचेच पडसाद आता संसदेत बघायला मिळाले आहेत. संसदेत काम करणाऱ्या तब्बल 400 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. संसदेत कोरोनाचा अशाप्रकारे हाहा:कार उडाल्यानंतर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी महत्त्वपूर्ण निर्देश जारी केले आहेत.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या