• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • पुण्यात महिलेवर बलात्कार, 24 तासांत पोलिसांनी आरोपीला केली अटक

पुण्यात महिलेवर बलात्कार, 24 तासांत पोलिसांनी आरोपीला केली अटक

या प्रकरणाची तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी जलदगतीने तपास करत 24 तासात आरोपीला बेड्या ठोकल्या.

  • Share this:
पुणे, 5 ऑगस्ट : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार आरोपीला 24 तासात अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. बसची वाट पाहत थांबलेल्या महिलेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका दुचाकीस्वाराने अज्ञात स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला आणि तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुबाडल्याचा प्रकार मुंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोमवारी दुपारी घडला होता. घटनेनंतर पीडित महिलेनं पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून आपल्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर हडपसर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचून या महिलेनं रितसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी या महिलेकडून माहिती जाणून घेतली. घटना मुंढवा परिसरात घडल्यामुळे गुन्हा नोंदवण्यासाठी पीडितेला मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये पाठवण्यात आलं. त्यानुसार मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी जलदगतीने तपास करत 24 तासात आरोपीला बेड्या ठोकल्या. रामचंद्र बनसोडे असं आरोपीचं नाव आहे.  आरोपीचं वय 50 ते 55 च्या दरम्यान असून त्याच्या दातावर काळा डाग असल्याची माहिती फिर्यादी महिलेने पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून घेत आरोपीचा शोध सुरू केला. फिर्यादी महिलेने सांगितलेल्या वर्णनानुसार हडपसर परिसरातील काळेपडळ येथे राहणाऱ्या रामचंद्र बनसोडे याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला तो 'तो मी नव्हेच' या अविर्भावात पोलिसांच्या प्रश्नाची उत्तरे देत होता. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांने आपला गुन्हा कबुल केला. दरम्यान, पोलिसांनी त्याला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.
Published by:Akshay Shitole
First published: