गुंगीचं औषध देऊन फेसबुक फ्रेंडनं केला बलात्कार, पुण्यातील धक्कादायक घटना

गुंगीचं औषध देऊन फेसबुक फ्रेंडनं केला बलात्कार, पुण्यातील धक्कादायक घटना

पीडित तरुणी आणि आरोपी यांची ओळख फेसबुकवरुन झाली होती.

  • Share this:

पुणे, 21 ऑक्टोबर : सोशल नेटवर्किंग साइटमुळे गुन्हे आणि अत्याचार होण्याचे प्रकार आजकाल खूपच वाढले आहे. नुकतंच फेसबुकवरुन ओळख झालेल्या तरुणानं एका 25 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. हा तरुण एवढ्यावरच थांबला नाही तर त्या तरुणीचे अश्लील फोटो काढून त्यावरुन तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. अखेर या सर्व प्रकाराला कंटाळून तरुणीनं पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी निशांत वामन भांगे (वय २८), नंदा भांगे, वामन भांगे (काळेपडळ, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी यांची फेसबुकवरुन ओळख झाली होती. त्यानंतर या तरुणानं तिला स्वारगेट परिसरात भेटायला बोलवले. तिथल्या एका लॉजवर हे दोघं भेटले. दरम्यान तरुणीचं डोकं दुखू लागल्यानं आरोपीनं तिला डोकेदुखीची गोळी दिली. मात्र ही गोळी खाल्ल्यानंतर ही तरुणी बेशुद्ध झाली. त्यानंतर आरोपीन तिच्यावर बलात्कार करुन तिचे अश्लील फोटो काढले आणि नंतर हे फोटो सोशल मीडियावर व्हयरल करण्याची धमकी देत कधीही भेटण्यास सांगू लागला.

फोटो लीक होण्याच्या भीतीनं पीडिता या तरुणाला तो सांगेल त्या ठिकाणी भेटत राहिली. दरम्यान हा सर्व प्रकार तरुणाच्या आईला समजला मात्र आपल्या मुलाला याचा जाब विचारण्याऐवजी तिनं या तरुणीलाच तू माझ्या मुलाला नादी लावलंस असं म्हणत तिला शिवीगाळ केली. तर तरुणाच्या वडीलांना हा प्रकार समजल्यावर त्यांनी या तरुणीला तुमचं लग्न लावून देतो असं सांगून तिची फसवणूक केली. त्यामुळे या वारंवार धमक्या आणि होत असलेल्या या तरुणीनं अखेर स्वारगेट पोलिस ठाण्यात आरोपीच्या विरोधात तक्रार केली आहे. या तरुणीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या आई-वडीलांवर गुन्हा दाखल केला आहे.

=========================================================

लोकसभेचे उमेदवार उदयनराजेंनी बजावला मतदानाचा हक्क, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2019 08:32 AM IST

ताज्या बातम्या